फक्त 7 टक्के व्याजावर कर्ज देणारी एकमेव योजना; व्यवसाय करायचा असेल, तर माहिती नक्की वाचा ! PM Svanidhi Yojana

PM Svanidhi Yojana : केंद्रशासनाकडून व्यवसाय करण्यासाठी नागरिकांना विविध योजनांच्या स्वरूपातून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत 01 जून 2020 रोजी अशाच गरजू उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री स्वानिधी योजना संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आली. सदर योजनेच्या माध्यमातून विशेषत: रस्त्यावर विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना, फळ विक्रेत्यांना आणि इतरांना आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री स्वानिधी योजनेच्या माध्यमातून सबसिडीचा लाभ दिला जातो आणि विहित मुदतीत हप्त्यामध्ये परतफेड करण्याची सुविधा दिली जाते.

प्रधानमंत्री स्वानिधी योजना

संपूर्ण देशभरातील जवळपास 50 लाख फेरीवाल्यांना एका वर्षासाठी 10,000 रुपये पर्यंत खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रशासनाकडून पंतप्रधान स्वानिधी योजना सुरू करण्यात आली, ज्यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायिकांना कर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन नव्याने व्यवसाय सुरू करता येईल. स्वानिधी योजनेअंतर्गत देण्यात येणारी कर्जाची रक्कम खूपच कमी असली, तरी याअंतर्गत मिळणारा लाभ खूपच चांगला आहे.

कर्जाव्यतिरिक्त स्वानिधी योजनेत परतफेडच्या वर्तनास प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक 7% व्याज अर्जदारांना अनुदान स्वरूपात दिला जातो. त्याचप्रमाणे डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी 1200 रुपयापर्यंत कॅशबॅकची संधीसुद्धा दिली जाते. फेरीवाल्यांकडून रकमेची परतफेड वेळेस केल्यात व्यवहारात डिजिटल पेमेंटचा उपयोग केल्यास त्यांना व्याज विहित मुदतीत भरावा लागणार नाही, सोबतच अनुदान देण्यात येईल. 2 जुलै 2020 पासून पीएम स्वानिधी कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसआयडीबीआय, सिडबी सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठीच्या एजन्सी आहेत.

PM स्वनिधी योजना उद्दिष्ट

व्यवसायिक व छोट्या उद्योजकांना स्वावलंबी व सशक्त बनवण्यासाठी केंद्रशासनाकडून स्वानिधि योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट छोट्या कामगारांना पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपला उदरनिर्वाह करता यावा हा आहे. यासाठीच केंद्र शासनाकडून सुरुवातीला 10,000 रु. कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं.

PM स्वनिधी योजनेचे फायदे

  • पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील जवळपास 50 लाख छोट्या उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज घेता येणार आहे.
  • केंद्रशासनाकडून पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना व छोट्या व्यवसायिकांना विशेषता: कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
  • रस्त्याच्या बाजूला सामान विक्री करणारे शहरी भागातील लोक स्ट्रीट वेंडर सेल्फ रिलायट फंड योजनेअंतर्गत लाभार्थी मानण्यात येतील.
  • पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत पद विक्रेत्यांना सुरुवातीला 10,000 रुपयापर्यंत भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, ज्याची परतफेड लाभार्थ्यांना सुलभ हप्त्यांमध्ये करता येईल.
  • स्वनिधी योजनेअंतर्गत एखाद्या लाभार्थ्यांनी विहित मुदतीत कर्ज घेऊन कर्जाचा भरणा केल्यास, त्यांना प्रोत्साहनपर 7 टक्के वार्षिक व्याज त्यांच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात जमा करण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment