Government Loan : आता ॲपवर मिळवा सरकारी कर्ज, RBI कडून नवा प्लॅटफॉर्म सुरु

Government Loan : जनसामान्य नागरिकांपासून लवकर नोकरदार व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला अडचणीच्या वेळी कर्जाची आवश्यकता भासते. हीच बाब लक्षात घेता रिझर्व बँकेकडून “ऑनलाईन पब्लिक टेक प्लॅटफॉर्मचा एक पथदर्शक” प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून बँकेकडून खूपच कमी वेळात आणि सोयीस्कर पद्धतीने घरची कर्जदारांना कर्ज मिळू शकणार आहे.

Government Loan On App

रिझर्व बँकेच्या ‘इनोव्हेशन हब’ कडून हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेला असून यामुळे खर्च घेण्याची प्रक्रिया एकदम सुलभ होईल, त्यासोबतच कर्ज घेताना येणारा वाढीव खर्चसुद्धा वाचून खूपच कमी खर्च लागेल. रिझर्व बँकेकडून सांगण्यात आले की, ” हा डिजिटल प्लॅटफॉर्म एक ओपन इन्फ्रास्ट्रक्चर, ओपन एप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) युक्त असून यात वित्तीय क्षेत्रातील सर्व युनिटस् प्लग अँड प्ले या मॉडेलवर सुलभतेने जोडले जाऊ शकतात.

एपीआय हे दोन एप्लीकेशनला जोडण्याची सुविधा देणार एक महत्त्वकांशी सॉफ्टवेअर असून यात वेगवेगळी आकडेवारी सामायिक करू शकतात. प्राप्त माहितीनुसार सध्या वैयक्तिक व्यक्ती किंवा शेतकरी किंवा इतर गरजू कर्जदारांना कर्ज मंजूर करताना अनेक प्रकारच्या माहितीची गरज भासते.

शेतकरी 0% व्याजदर योजना; शेतकऱ्यांना गावातच कमी व्याजदरात कर्ज मिळणार

ही माहिती केंद्र व राज्य सरकार, अकाउंट ॲग्रीकेटर्स, बँका किंवा क्रेडिट माहिती देऊ. अशी माहिती प्राप्त करण्यास कधी कधी महिन्याभराचा कालावधी लागतो, त्यामुळे कर्जदारांना कर्ज प्रक्रिया खूपच क्लिष्ट व किचकट वाटू लागते परिणामी कर्ज प्रलंबित राहतो. आता या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये ही सर्व माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होईल.

कोणती कर्ज मिळणार ?

  • 1.6 लाखापर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड कर्ज
  • दूध उत्पादकांचे कर्ज
  • विना जामीन MSME कर्ज
  • वैयक्तिक कर्ज

अन्य सुविधा व फिनटेकवर नजर

रिझर्व बँकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममुळे फिनटेक कंपन्यावर नजर ठेवणे ही शक्य होणार आहे. हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यामागील हा सुद्धा मुख्य उद्देश आहे. सदर प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आधार ई-केवायसी, पॅन प्रमाणीकरण, अकाउंट ॲग्रीगेशन इत्यादी सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment