PM Kusum Solar Yojana : या कारणास्तव 2,500 शेतकऱ्यांचे सोलरपंप अर्ज त्रुटीमुळे प्रलंबित

PM Kusum Solar Yojana : अपारंपारिक कृषी जलपंपना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. एकंदरीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला, तर महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यात प्रधानमंत्री कुसुम योजना प्रकल्पाला मध्यम प्रतिसाद मिळाला आहे. हजारो शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमुळे रखडले असल्याची माहिती समोर आली.

कुसुम सोलरपंप योजना नवीन अपडेट

सदर योजनेत कृषी पंपासाठी विज आणि इतर पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांना पर्याय म्हणून सौरपंपाची तरतूद आहे. यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत महाऊर्जा पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कुसुम सोलरपंप योजना खाती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास 6 लाख इतकी आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील केवळ 24 हजार 987 शेतकऱ्यांनी कुसुम सोलापूर योजनेसाठी पोर्टलवर अर्ज केला आहे. मात्र आत्तापर्यंत केवळ 2,332 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंपाचा लाभ मिळालेला असून तब्बल 2,528 अर्ज त्रुटीमुळे मागे पडलेले आहेत.

अर्जामधील त्रुटीसाठी शेवटची मुदत

या त्रुटी दूर करण्याची अंतिम मुदत सर्व शेतकऱ्यांना 24 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. परंतु वरील आकडेवारी पाहता या योजनेला मिळणारा प्रतिसाद खूपच कमी दिसताना आढळून आले. या महत्त्वकांक्षी योजनेचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार व प्रचार करण्यासाठी संबंधित विभागाकडून पुरेसे प्रयत्न केले गेले नाहीत, असं म्हणण्यास काही हरकत नाही.

कुसुम सोलारपंप योजना SMS आला असेल, तर लवकर हे काम करा !

📣 सूचना : ज्या शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारचा मेसेज किंवा इतर नोटिफिकेशन आलेला नसेल, त्यांनी लॉगिन करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासून पहावी. अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्यास, त्यानुसार अर्ज दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा सदर योजनेपासून लाभार्थी वंचित राहू शकतात.

Leave a Comment