Kusum Solar Yojana : कुसुम सोलर पंपाचा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट, संदेश आलेल्या शेतकऱ्यांनी हे काम लवकर करा

Kusum Solar Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये 17 मे 2023 पासून महाऊर्जा विभागाकडून शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजना देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आले होते. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुसुम सोलरपंप योजनेसाठी नोंदणी केली. एकदम दोन ते तीन वर्षाच्या कालांतराने सोलर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

महाऊर्जामार्फत कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांसाठी काही अटी व शर्ती ठेवण्यात आलेल्या होत्या, ज्याप्रकारे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद असावी, सामायिक क्षेत्र किंवा पाण्याचा स्त्रोत सामायिक असल्यास शेतकऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाच्या बॉण्डवरती द्यावा इत्यादी; परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी सोलर पंपाचा कोटा लवकरच संपून जाईल म्हणून घाई गडबडीने चुकीची माहिती, अपूर्ण माहिती व कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड केलेली नव्हती.

अर्ज दुरुस्तीसाठी वेबसाईट लिंक येथे क्लिक करून पहा

अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना विहीर किंवा बोर असल्याबाबतचा दाखला किंवा संमतीपत्र किंवा एखादा बाँड अपलोड केलेला नसेल, तर अशा सर्व संबंधित शेतकऱ्यांना महाऊर्जामार्फत अर्जाची छाननी करताना नोंदणीकृत मोबाईलवरती एसएमएस पाठवण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला नोंदणी केली होती, त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आहे त्यांना एसएमएस पाठविण्यात येत आहेत.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मोबाईलवरती त्रुटीचा एसएमएस आलेला असेल, त्यांनी लवकरात लवकर महाऊर्जाच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून संबंधित कागदपत्र अपलोड करावीत किंवा संबंधित त्रुटी दूर करावी. बहुतांश शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे एसएमएस आलेले आहेत, त्यामुळे तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा एसएमएस आला असेल, तर लवकरात लवकर पोर्टलवर लॉगिन करून त्रुटी दूर करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी.

  • सातबारा अपलोड करा.
  • विहीर बोरवेल नोंद नसलेला सातबारा उतारा अपलोड केलेला आहे.
  • पाण्याचा स्त्रोत म्हणजेच बोर किंवा विहीर सामायिक असेल तर, त्याबद्दलचा ना हरकत 200 रुपयांच्या बाँडवर
  • याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना इतर त्रुटीचे एसएमएस आले असतील, तर त्यांनी पोर्टलवर लॉगिन करून त्रुटीचे निराकरण करावे.

Leave a Comment