PM Kusum Solar Yojana : सौर पंपाचा किती कोटा शिल्लक ? आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी अर्ज केला !

PM Kusum Solar Yojana : पीएम कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकरी खूप मोठ्या दिवसापासून वाट पाहत होते. शेतकऱ्यांना आस लागलेली होती की, पीएम कुसुम सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज केव्हा सुरू होतील ? तर सौर कृषी पंप योजनेच्या अर्जाचा पाऊस राज्यात 17 मे पासून पडण्यास सुरू झाला.

नवीन अर्जाची स्वीकृती म्हणजेच कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 17 मे 2023 पासून राज्यात चालू झाली याची अधिकृत सूचनासुद्धा शेतकऱ्यांना न्युज पेपरच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. कुसुम सोलार पंप योजनेची ऑनलाईन वेबसाईट सुरू होताच अवघ्या 10 दिवसात राज्यातील 23 हजार 584 शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केलेला आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांनी अर्ज केला ? येथे क्लिक करून पहा

कृषी पंप सौर ऊर्जेद्वारे जोडण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान दिलं जातं. याच माध्यमातून राज्य शासनाच्या व अर्थसाहाय्यक त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या स्वयंअर्थसहाय्य हिस्सातून यासारख्या विविध योजना राबविण्यात येतात. संबंधित योजनेची व ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती तुम्ही महाऊर्जाच्या (www.mahaurja.com) अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन मिळवू शकता.

शेतकरी मित्रांनो, अद्याप राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये खुल्या प्रवर्गासह, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी कोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जर तुम्ही अद्याप कृषी सौर पंपासाठी ऑनलाईन अर्ज केलेला नसेल, तर महाऊर्जाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

येथे क्लिक करून, ऑनलाईन अर्ज करा !