PM Kisan Yojana : 15 वा हफ्ता मिळाला नाही ? ‘याठिकाणी’ तक्रार करा, हफ्ता 100% मिळणार

शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी थोडीफार आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्रशासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला योजनेत सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत होता; परंतु कालांतराने यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही बदल करण्यात आले, जश्याप्रकारे ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, land seeding इत्यादी. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी निर्माण येऊ लागल्या, काही शेतकऱ्यांना हप्तासुद्धा मिळालेला नाही. या सर्व बाबीला पर्याय म्हणून शासनाकडून पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे.

पीएम किसान योजना हेल्पलाइन क्रमांक

पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हफ्ता मिळवताना बऱ्याच अडचणी येत आहेत. शेतकरी जवळील महा-ई-सेवा केंद्र, कॉमन सर्विस सेंटर किंवा गावातील सुशिक्षित तरुणांना माहिती विचारून सुद्धा, त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही किंवा दिली जात नाही. याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसंदर्भात काही अडचण असल्यास शेतकरी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शासनाकडून देण्यात आलेल्या क्रमांकावर कॉल करून आपल्या तक्रारी व त्यांचं निवारण करू शकतात, तर जाणून घेऊयात शासनाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांकाचा नंबर व सोबतच ई-मेल ऍड्रेसचा संपूर्ण पत्ता.

याठिकाणी तक्रार करा

पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मागील काही दिवसापूर्वी 15 हप्ता वितरित करण्यात आला देशभरातील शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली; परंतु काही कारणास्तव बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या पीएम किसान खात्यातील त्रुटीमुळे पैसे मिळाले नाहीत, तर अशा शेतकऱ्यांनी खाली देण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरती संपर्क साधून आपली त्रुटी समजून घेऊ शकतात किंवा इतर तक्रारी असल्यास इतर तक्रार सुद्धा करू शकतात.

📞 टोल-फ्री क्रमांक : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारने 012-243-0606 आणि 155261 या दोन दूरध्वनी क्रमांक सुरू केलेल्या आहेत. यासोबतच 18001155266 या मोफत टोल फ्री क्रमांकावर शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 5 हा कालावधी देण्यात आलेला आहे.

📨 ईमेलद्वारे तक्रार : दूरध्वनीद्वारे तक्रार करण्यासोबतच सुशिक्षित शेतकऱ्यांसाठी ई-मेलद्वारे तक्रार करण्याची सुविधा सुद्धा सरकारकडून देण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या तक्रारी pmkisan-ict@gov.in किंवा pmkisan-funds@gov.in या ई-मेल आयडीवर पाठवू शकतात. यासोबतच शेतकऱ्यांना अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खालील लिंकवर क्लिक करावे.

अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment