PM Kisan : 15 व्या हफ्ता अगोदर करा हे महत्वाचं काम करा; अन्यथा मिळणार नाही लाभ !

PM Kisan : केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामागील मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय मिळावं. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता वितरित केला जातो, तर एकंदरीत वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येत.

PM Kisan योजना महत्वाचे बद्दल

शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत मागील काही महिन्यांमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले. ज्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी असेल, बँकेला आधार लिंक असेल, किंवा फिजिकल फॉर्म व्हेरिफिकेशन असेल अशा विविध बाबी पारदर्शकता आणण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आल्या.

पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभार्थी वगळण्यासाठी 10व्या हफ्त्यापासून या नवीन अटी शासनाकडून सुरू करण्यात आल्या. 11व्या हप्त्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याऐवजी, त्यांच्या आधारकार्ड लिंक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्यास लिंक नसेल, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळत आहे आणि पुढेसुध्दा हफ्ता याचप्रमाणे वितरित होणार.

DBT स्टेटस कसं चेक करावं ?

शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अद्याप माहिती नसेल की तुमचा आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे किंवा लिंकचा नाही, तर यासाठी खालील प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवर करून फक्त काही मिनिटात आधार लिंक बँक अकाउंट किंवा DBT स्टेटस चेक करू शकता.

1) Aadhar Bank Link Status चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल – येथे क्लिक करा.

2) युआयडीएआयची म्हणजेच आधार कार्डची वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी बरेच पर्याय दिसतील, त्यामधील My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.

3) My Aadhaar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर Aadhar Services या पर्यायाखाली सहाव्या क्रमांकावर Check Aadhar Bank Linking Status हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

4) त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन टॅब उघडेल, त्याठिकाणी तुम्ही आधार लिंकिंगची स्थिती तपासू शकता.

📣 PM किसान योजनेत कुटूंबातील किती व्यक्तींना लाभ घेता येतो ? माहिती पहा !

5) सर्वप्रथम तुमचा 12 अंकी आधार नंबर टाका, आता 12 अंकी नंबर टाकल्यानंतर Captcha Code टाका आणि Send Otp या पर्यायावर क्लिक करा.

6) तुमच्या आधार लिंक मोबाइलवरती एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी त्याठिकाणी टाका.

7) ओटीपी टाकल्यानंतर आता तुमच्यासमोर तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेला बँक तपशील दाखवण्यात येईल.

8) तुमचे Bank Seeding Status, Seeding Date आणि Bank Name त्याठिकाणी दाखवण्यात येईल.

तर अशाप्रकारे मित्रांनो एकदम सोप्यापद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या आधारकार्डला कोणती बँक लिंक आहे ? हे पाहू शकता. जर तुमच्या आधार कार्डला बँक लिंक नसेल, तर लवकरात लवकर जाऊन तुम्हाला ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हवा असेल, त्या बँकेत Aadhar Seeding NPCI Linking चा फॉर्म भरून द्यावा लागेल.

PM Kisan आधार बँक सलग्न + eKYC प्रेसनोट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याचप्रमाणे पीएम किसानच्या खात्याला Land Seeding म्हणजेच जमिनीची माहिती सलग्न आहे का ? हे सुद्धा पीएम किसानच्या पोर्टलवर तपासा. तसेच तुमची केवायसी झालेली नसेल तर केवायसीसुद्धा लवकरात लवकर करून घ्या. या सर्व बाबी पूर्ण केल्यास पुढील हप्ता तुम्हाला नक्कीच 100% भेटेल.

Leave a Comment