PM Kisan योजनेचा लाभ कुटुंबातील किती व्यक्तींना घेता येतो ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan : केंद्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाच्या माध्यमातून दरवर्षी 6,000 रु. मानधन तत्वावर दिले जातात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी योजना खूपच लाभदायक ठरली आहे. शेतकऱ्याला आर्थिक सहाय्य मिळावं हा या योजनेचा मुख्य हेतू होता. सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्याला 2,000 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जातो. हा हफ्ता वर्षामधून तीन वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतो.

नुकताच 14 वा हफ्ता वितरित

PM किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकता 14 वा हप्ता वितरित करण्यात आला. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाकडून अनेक नियम व अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. या नियमांच पालन न केल्यास संबंधित लाभार्थ्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. सोबतच त्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येतो.

💁 हे पण वाचा : टाटा सोलर डीलरशीप घ्या आणि दरमहा लाख रु. कमवा !

कुटुंबातील किती व्यक्ती पात्र ?

बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ? PM किसान योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती व्यक्तींना किंवा सदस्यांना दिला जातो. कारण कुटुंबात वडील व्यक्ती व त्यांचा पुढील अपत्य असतात. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावाने जमीन असल्यास सर्वांना लाभ मिळणार काय ? सदर योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यानाच मिळणार आहे. डॉक्टर, अभियंता किंवा इतर कोणत्याही बिगर शेती व्यवसाय गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही. याव्यतिरिक्त 10 हजार रुपयापेक्षा जास्त पेन्शन असणारे ज्येष्ठ नागरी, सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले व्यक्ती इत्यादींनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

याव्यतिरिक्त कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती म्हणजे फक्त शेतकरी ज्यांच इतर कोणत्याही माध्यमातून उत्पन्न येत नसेल त्यांना लाभ देण्यात येईल; परंतु यापैकी फक्त एकालाच या योजनाचा नाव देण्यात येईल, म्हणजेच पती किंवा पत्नी यापैकी एकाच वडील लाभार्थ्यांना लाभ देय असेल. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजेच वडील किंवा आई यांच्या सर्व अपत्यांना लाभ देण्यात येईल; परंतु त्यांच्या नावाने शेतजमीन असणे आवश्यक आहे.

PM Kisan Opt-Out Form

एखाद्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नसतानासुद्धा (अपात्र) कळत-नकळत लाभ घेतलेला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या लाभार्थ्यांना सदर योजनेतून बाहेर पडण्याची सुविधा संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे प्रक्रिया करून या योजनेतून बाहेर पडता येते.

  • सर्वप्रथम पीएम किसानच्या Pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर आल्यानंतर “Voluntary Surrender Of PM Kisan Benefits” या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल क्रमांक टाका, तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठविण्यात येईल.
  • मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
  • स्क्रीनवर तुम्हाला सर्व माहिती दाखवली जाईल, ज्यामध्ये तुमचं सर्व नाव व तुम्हाला आत्तापर्यंत मिळालेल्या हप्त्यांचा तपशील.
  • त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की, सदर योजनेचा लाभ घेणे सुरू ठेवू इच्छित नसल्यास पुढे जाण्यासाठी “स्वीकारा” वर क्लिक करा आणि नंतर “होळी “होय” वर क्लिक करा.
  • वरीलप्रमाणे सर्व प्रक्रिया करून तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकतात, यासाठी तुमच्या रेकॉर्डसाठी अधिकृत सरकारी प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल.

Leave a Comment