PM Kisan AI Chatbot : मोदी सरकारनं पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सुरु केली आता नवीन सुविधा, AI देणार प्रश्नांची उत्तर

PM Kisan AI Chatbot : केंद्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत नुकताच एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला असून, आधुनिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेच्या विविध बाबींची माहिती चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहे. यासंदर्भातील थोडक्यात आणि कामाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

PM किसान AI चॅटबॉट सुविधा

तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये एका नवीन सुविधेची भर घालण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे मदत होईल. केंद्रसरकारकडून पीएम किसान योजनेसाठी नवीन चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यामार्फत पीएम किसान एआय चॅटबॉट लाँच करण्यात आलं. यामध्ये विविध 5 भाषांमधील सुविधा देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात एआय चॅटबॉट शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची सध्यास्थिती, पेमेंट तपशील, अपात्रता कारण आणि इतर विविध सुविधानबद्दल मदत करेल. PM किसान मोबाईल एप्लीकेशनच्या माध्यमातून सलग्न आहे.

5 विविध भाषेत AI चॅटबॉट उपलब्ध

दरम्यान, पीएम-किसान तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये एआय चॅटबॉट सादर करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सुलभ आणि सोपा व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या चॅटबॉट सुविधा इंग्रजी, हिंदी, बंगाली, उडिया आणि तामिळ भाषेत सुरु करण्यात आलेली असून लवकरच हे देशातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध होईल.

📣 PM किसान 15व्या हफ्ता अगोदर करा हे काम ? नाहीतर मिळणार नाही हफ्ता !

शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची त्वरित, स्पष्ट आणि अचूक उत्तरे मिळतील, असेही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटले आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे केवळ पारदर्शकता वाढणार नाही, तर शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल.

PM किसान चॅटबॉटचा फायदा

PM किसान AI चॅटबॅट शेतकऱ्यांना त्यांच्यामार्फत विचारन्यात आलेल्या प्रश्नाची उत्तर देण्याचं काम करेल. बहुतांश शेतकऱ्यांना वारंवार PM किसान योजनेसंदर्भात प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तर या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळतील. उदारणार्थ-एखाद्या शेतकऱ्याच्या PM किसान योजनेला आधारकार्ड लिंक करावयाचे आहे, लिंक कसं करावं टाकल्यास संपूर्ण माहिती Chatbot आपल्याला देईल. त्याचप्रमाणे Beneficiary स्टेटस चेक करायच असल्यास अचूक माहिती AI Chatbot देईल. पीएम किसान योजना हि शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. आता यामध्ये आणखीन सुविधांसाठी AI चॅटबॉट चा वापर करण्यात येत आहे.

Leave a Comment