नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महत्त्वपूर्ण अपडेट; आता 2,000 रु. ऐवजी 3,000 रु. मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं, यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली; याच धरतीवर महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अशा योजनेचा फायदा मिळावा यासाठी राज्यशासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (CM किसान योजना) सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली होती, त्याचा अधिकृत शासन निर्णयसुद्धा (GR) नुकताच संबंधित विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला होता.

वार्षिक 6,000 रु. मानधन

सदर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच दर 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता म्हणजेच वार्षिक 6,000 रुपयाचा हप्ता देण्याचा निर्णय शासन निर्णयाच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता; परंतु यामध्ये अमुलाग्र असा बदल करण्यात आलेला असून, आता शेतकऱ्यांना 2,000 रु. ऐवजी 3,000 रु. दिले जाणार आहेत. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

पीएम किसान योजनेचे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र असतील. या सर्व पात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या 14 व्या पीएम किसान योजनेच्या हप्त्या बरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची रक्कम वितरित करण्याची पावलेसुद्धा उचलली जात आहेत. लवकरच सीएम किसान योजनेचा पहिला हप्ता देखील वितरित केला केला जाईल.

नवीन कृषी मंत्र्याचा निर्णय

काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आला, ज्यामध्ये राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा नुकताच कृषीपदाचा भार स्वीकारलेले धनंजय मुंडे असतील. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीखात्याचा कारभार सोपवण्यात आला. कृषीमंत्री होता तात्काळ धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण बदल केला.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 2,000 चे तीन हप्ते देण्याची तरतूद होती; परंतु याऐवजी शेतकऱ्यांची नड लक्षात घेता, खरिपाच्या पेरणीपूर्व 3,000 रु.चा एक हप्ता आणि रब्बीच्या पेरणीपूर्व 3,000 रुपयांचा दुसरा हफ्ता अश्या दोन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा असा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यामुळे 2,000 रु. ऐवजी 3,000 रु. मिळणार

माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातूनसुद्धा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पैशाची खूपच गरज भासते, त्यांना प्रतिएकर 10,000 रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली होती, हीच बाब लक्षात घेऊन अशा कालावधीत शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले, तर त्या पैशांचा योग्य उपयोग होऊ शकतो, यामुळे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेच्या अंतर्गत खरीप पेरणीपूर्व अर्धी रक्कम व रब्बी पेरणीपूर्व अर्धी रक्कम अशी दोन टप्प्यांमध्ये एकूण लाभाची रक्कम वितरित केली जाणार आहे.

PM किसान सन्मान निधी योजना 14 वा हफ्ता यादिवशी मिळणार !

लवकरच हा प्रस्ताव कृषी विभागाच्या माध्यमातून शासनाला सादर करण्यात येईल व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून यावर विचार करून प्रस्ताव कसा आहे? याबद्दलची शहानिशा करून नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येईल.

Leave a Comment