PM किसानचा हफ्ता आला ! नमो शेतकरी योजनेचा कधी येणार ? ही 32 लाख शेतकरी लाभापासून वंचित

केंद्रशासनाप्रमाणेच राज्यशासनाकडून शेतकऱ्यांना मानधन तत्वावर वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. नुकताच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आला. आता बहुतांश शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे ? नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता केव्हा येईल ? तर याबद्दलची थोडक्यात माहिती आपण याठिकाणी पाहूयात.

केंद्रसरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे निकष राज्य सरकारच्या “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला” लागू करण्यात आली आहेत. सदर योजनेअंतर्गत जवळपास 71 लाख शेतकऱ्यांनपैकी निकष पूर्ण होत नसल्याने 32 लाख 37 हजार शेतकरी या योजनेच्या पहिल्या त्यापासून वंचित राहणार असल्याची माहित विधान परिषदेत देण्यात आली.

अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली सुरु

पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे सदस्य अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केली होते. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र शेतकऱ्यांची वसुली करण्यात येईल आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल.

राज्यातील जवळपास 11 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 1554 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने अशा अपात्र शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वसुली करण्याचे आदेश केंद्र शासनाकडून काढण्यात आलेले आहेत.

1 ला हफ्ता कधी मिळणार ?

शासनाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यावरून शेतकऱ्यांना 15 ऑगस्ट 2023 पूर्वी ही रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ता ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment