Namo Shetkari योजनेच्या हफ्त्याला विलंब का होतोय ? कधी मिळणार Namo Shetkari Sanman Yojana 1st Installment

PM किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 6,000 रु. मिळावेत, यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, की आम्हाला नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार ? तर शेतकरी मित्रांनो, यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात; म्हणजेच हप्त्याला नेमका विलंब का होतोय ? हप्ता नेमका किती तारखेपर्यंत मिळू शकतो ?

Namo Shetkari Yojana Maharashtra

बहुतांश शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दल संपूर्ण मूलभूत माहिती आहेच, जशाप्रकारे शेतकऱ्यांना लाभ कसा मिळणार ? यासाठी कोणती शेतकरी पात्र असतील ? कारण ज्या दिवशी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सरळ व सोप्या भाषेत सांगितल होते की, ज्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ देण्यात येईल.

या योजनेत देखील केंद्राच्या PM किसान योजनेप्रमाणेच वार्षिक 6,000 रु. दोन-दोन हजार रुपयाच्या तीन टप्प्यांमध्ये दिली जातील अशी माहिती देण्यात आली होती; परंतु योजनेचे पैसे किंवा पहिला हप्ता केव्हा वितरित केला जाईल, अशा प्रकारचा मोठा प्रश्न सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या मनामध्ये सातत्याने येत आहे.

मागील काही दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं की, पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ज्यादिवशी वितरित करण्यात येईल, त्याच दिवशी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 1ला हफ्ता वितरित करण्यात येईल; परंतु ही घोषणा करूनसुद्धा महिन्याभराचा कालावधी उलटून गेला तरी, अद्याप नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची 1ल्या हप्त्याची कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

नमो शेतकरी योजना हफ्ता रखडण्याच मुख्य कारण ?

शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरात लवकर वितरित करण्यात यावा अशा सूचना काही दिवसापूर्वीच शासनाकडून देण्यात आल्या होत्या, किमान ऑगस्टच्या पंधरवड्यात योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळावा, अशी शासनाची इच्छा होती, तथापि आधी या संदर्भातील आर्थिक तरतूद नव्हती आणि आता संगणकीय प्रणाली अपूर्ण आहे.

📣 सतत 21 दिवस पावसाचा खंड पडल्यास; शेतकऱ्यांना मदत मिळणार !

त्यामुळे निधी वितरण करण्यासाठी वेळ लागत आहे. याच कारणाने नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल जात असल्याची माहिती सांगण्यात आली. त्यामुळे या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण तांत्रिक अडचणी दूर करून योजना कार्यान्वित करण्यात येईल. त्यादृष्टीने सॉफ्टवेअरच्या अंतिम साधनांसाठी ‘महाआयटी’ या कंपनीमार्फत धावपळ सुरू आहे, अशी संबंधित सूत्राकडून माहिती देण्यात आली.

नमो योजनेची तयारी अशी..

  • ‘महाआयटी’ कडून स्वातंत्र्य सॉफ्टवेअरची निर्मिती अंतिम टप्प्यात सुरू..
  • योजनेला ‘पीएफएमएस’ शी म्हणजेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीशी जोडण्यात येणार
  • पहिला हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभाग सज्ज
  • तांत्रिक मुद्द्यामुळे केंद्राचा पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास संबंधित शेतकऱ्याला नमोचा हप्ता देखील मिळणार नाही
  • तांत्रिक अडचण दूर झाली आणि PM किसानचा पुढील हप्ता दिला गेल्यास, संबंधित शेतकऱ्याला राज्याकडून मागील थकीत हप्त्यासह मिळणार.

Leave a Comment