रेशनकार्डधारक महिलांना कॅप्टिव्ह मार्केट योजना अंतर्गत मोफत साडी मिळणार : Mofat Sadi Yojana

हा लेख वाचून कदाचित सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल; परंतु ही बातमी एकदम खरोखर आहे. या योजनेची घोषणा शासनाकडून नुकतीच करण्यात आलेली असून या योजनेला मोफत साडी योजना किंवा Captive Market Yojana या नावानं ओळखलं जात आहे. शासनाकडून आता महिलांना रेशन धान्यासोबत पाच वर्षासाठी दरवर्षी एक साडी याप्रमाणे 5 साड्या वाटप केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती व शासन निर्णय आपण सदर लेखाच्या माध्यमातून पाहुयात.

महिलांसाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना

दिनांक 2 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्याच्या “एकात्मिक व शाश्वत वस्त्र उद्योग धोरण 2023-28” जाहीर करण्यात आला. सदर धोरणानुसार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना वस्त्रोद्योग विभागाकडून यंत्र मागावर विणलेली प्रत्येक कुटुंब एक साडी मोफत वाटप करण्याची योजना शासन निर्णयाच्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहे.

जर तुम्हीसुद्धा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिला असाल तर तुम्हाला कॅपिटिव्ह मार्केट योजना अंतर्गत मोफत साडी दिली जाणार आहे. रेशनकार्डवर मोफत साडी देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला या शासन निर्णयाची पीडीएफ कॉपी तुम्ही या लेखाच्या शेवटी डाऊनलोड करून वाचू शकता.

योजना नावकॅप्टिव्ह मार्केट योजना
कोणामार्फत सुरुवातमहाराष्ट्र शासन
योजना चालू वर्षनोव्हेंबर 2023
लाभार्थी कोणअंत्योदय रेशनकार्डधारक (AAY)
अर्जाची प्रक्रियाऑफलाईन
योजना कालावधी2023-2028

मोफत साडी योजना कोणत्या महिलांसाठी लागू असेल, यासाठी काय पात्रता लागेल किंवा कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच सदर योजनेचा कालावधी किती असेल ? यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण खालीलप्रमाणे पाहुयात.

मोफत साडी योजना कालावधी

सदर योजनेचा कालावधी सन 2023 ते 2018 या पाच वर्षासाठी शासनाकडून निश्चित करण्यात आलेला असून या पाच वर्षात अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबातील महिलांना दरवर्षी एक साडी याप्रमाणे 5 वर्षासाठी 5 साड्यांच वाटप केलं जाणार आहे.

लाभार्थी व इतर माहिती

  • राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना कॅप्टिव्ह मार्केट योजना किंवा मोफत साडी योजनाचा लाभ देण्यात येईल.
  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाची संख्या 24,58,547 इतकी आहे, म्हणजेच इतक्या कुटुंबातील महिलांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • दरवर्षी अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संख्येनुसार लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ किंवा घट झाल्यास याप्रमाणे साडी वाटप करण्यात येईल.
  • मोफत दिल्या जाणाऱ्या एका साडीची किंमत 355 रु. इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ असा की 355 रुपये इतकी बाजारात किंमत असलेली साडी अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना देण्यात येईल.
  • एका वर्षातून केवळ एकदाच मोफत साडी योजनेचा लाभ देण्यात येईल, त्यानंतर पुढील साडी पुढील वर्षात देण्यात येईल. साडी वाटप शासनाकडून ठरविण्यात आलेल्या सणासुदीच्या दिवशी रेशनकार्डधारक विक्रेत्याकडून वितरित करण्यात येईल.

मोफत साडी योजना GR | कॅप्टिव्ह मार्केट योजना GR

अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातील महिलांना लवकरात लवकर मोफत साडी योजनेचा लाभ दिला जाणारा असून यासंदर्भातील महत्त्वपूर्ण शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. संपूर्ण शासन निर्णय तुम्ही खालील लिंकवरती क्लिक करून सविस्तर वाचू शकता. राज्यातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी शासनाकडून घेण्यात आलेला हा मोफत साडी वाटप योजना कार्यक्रम खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Comment