या जिल्ह्यात नवीन रेशन धान्य दुकानासाठी अर्ज सुरू : Mahila Bachat Gat Yojana Maharashtra 2023

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या रास्त भाव धान्य दुकान म्हणजेच रेशन दुकान यांचे वाटप जिल्ह्यातील महिला बचत गट यांना देण्यात येणार आहे. त्यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून महिला बचत गटांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यामधील एकूण 7 तालुक्यात जवळपास 111 रास्त भाव दुकान धान्य वाटप करण्यात येणार आहेत.

महिला बचतगट योजना महाराष्ट्र 2023

वाटप करण्यात येणाऱ्या रेशन दुकानांपैकी 99 रास्त भाव धान्य दुकान रिक्त आहेत. 2017 मधील सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयानुसार रास्त भाव धान्य दुकान प्राधान्याने महिला बचत गटांना द्यावयाचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त असलेली रास्त भाव दुकान महिला बचत गटांना देण्यात येणार आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 99 रिक्त राशन दुकानासाठी पात्र महिला बचतगटानी विहित मुदतीत संबंधित कार्यालयाकडे अर्ज करावा अर्ज करण्यासाठी महिला बचत गटांना 30 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. अर्ज सादर केल्यानंतर पात्र अर्जामध्ये गुणानुक्रमे बचत गटांची रास्त भाव धान्य दुकानासाठी निवड करण्यात येईल

निवड प्रक्रिया कशी ?

रेशनधान्य दुकान महिला बचत गटांना देण्याची प्रक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत पार पाडण्यात येईल. संबंधित बचतगटांनी कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जाच्या माध्यमातून निकषांची पूर्तता करणाऱ्या महिला बचतगटांची रास्त भाव धान्य दुकानासाठी निवड करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभाग तहसील कार्यालय, अकोला यांच्यामार्फत देण्यात आली.

सूचना : ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नवीन रेशन दुकानासाठी बचतगटाच्या माध्यमातून अर्ज करत असाल, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्र जिल्हानिहाय वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे बचत गट अर्जदारांनी संबंधित तहसील कार्यालयात जाऊन अर्जाचा नमुना आणि सोबतच लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची चौकशी करावी.

नवीन स्वस्त धान्य रेशन दुकान परवाना मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ग्रामसभेचा ठराव दुकान मागणीपत्र
  • घर टॅक्स पावती किंवा सातबारा, मालकीपत्र इत्यादी
  • बचतगट स्थापन केल्याचा पुरवा
  • बचतगटाचा वार्षिक लेखा तपासणी अहवाल
  • गुन्हा दाखल नसल्याबाबतचा शपथपत्र
  • आधारकार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्र

तालुकानिहाय रिक्त रेशन दुकानांची संख्या

तालुकारिक्त दुकानांची संख्या
अकोला17
बार्शीटाकळी21
तेलाहार13
मूर्तिजापूर17
अकोट18
पातूर09
बाळापूर04

Leave a Comment