माहेर घर योजना या महिलांना मिळणार शासनाकडून लाभ, माहिती कामाची नक्की वाचा

महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येतात. यापैकीच एक गरोदर मातांसाठी सुरू करण्यात आलेली शासनाची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे माहेरघर योजना होय. सदर योजनेच्या माध्यमातून मातेची राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था याचप्रमाणे खाण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा संबंधित विभागाकडून मातेला उपलब्ध करून देण्यात येतात.

माहेर घर योजना महाराष्ट्र

राज्यातील बहुतांश आदिवासी लोकसंख्या ही डोंगराळ प्रदेशात पाड्यामध्ये वास्तव्यास असतात. आदिवासी पाड्यांमध्ये आणि ठिकाणी पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी सोय नसते, पर्यायी माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

आदिवासी भागातील गर्भवती महिलांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, अशा विविध आर्थिकदृष्ट्या अशक्य अडचणी लक्षात घेऊन राज्यशासनाकडून सन 2010-11 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत माहेरघर योजना सुरू करण्यात आलेली आहे. सुरक्षित व वैद्यकीय संस्थांमध्ये बाळंतपण निश्चित करण्यासाठी गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची विशेषता सुरुवात करण्यात आलेली आहे.

अंमलबजावणीची पद्धत

माहेर घर योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली बांधण्यात आलेली आहे. माहेर घरामध्ये गर्भवती महिला प्रसूतीपूर्वी 4-5 दिवस अगोदर भरती करण्यात येतात. गर्भवती महिलांची आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून दैनंदिन तपासणी केली जाते. यादरम्यान काही गुंतागुंत आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत यासंदर्भात माहिती दिली जाते.

माहेर घरामध्ये गर्भवती महिलेसोबत तिचे लहान मुल किंवा एक नातेवाईक यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. राहण्यासोबतच गर्भवती महिला व सोबतच्या नातेवाईकांना भोजनाची सोय आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत महिला स्वयंसहाय्यता बचत गट कडून करण्यात येईल. बचत गटाला किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला एका लाभार्थीमागे रु. 500 देण्यात येतील.

सेवा देणाऱ्या संस्था

राष्ट्रीय आरोग्य कार्यकारी बैठकीत आलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात ही योजना राबविण्यात यावी, परंतु अद्याप या योजनेअंतर्गत 2023-24 या सालपर्यंत राज्यातील नऊ जिल्ह्यातील 57 प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बांधण्यात आलेली आहे. माहेरघर बांधण्यात आलेल्या जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे पाहू शकता.

  1. नाशिक
  2. ठाणे
  3. नंदुरबार
  4. नांदेड
  5. यवतमाळ
  6. गोंदिया
  7. चंद्रपूर
  8. गडचिरोली
  9. अमरावती
  10. इतर कार्यरत

👇👇👇👇👇👇👇👇

महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना

Leave a Comment