Tractor Subsidy : महाडीबीटीच्या ट्रॅक्टर आणि इतर अवजारांच्या अनुदानात मोठी वाढ ! आता इतकं अनुदान मिळणार

शेतकऱ्यांसाठी विविध पोर्टलच्या माध्यमातून नवनवीन योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांना एकाच पोर्टलवरती विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी कृषी विभागाकडून काही वर्षांपूर्वी Mahadbt Farmer Login पोर्टल सुरू करण्यात आलं. सदर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजार व उपकरण खरेदीसाठी 50% पासून 100% पर्यंत अनुदान दिलं जात. शासनाकडून नुकतीच ट्रॅक्टर अनुदानात वाढ करण्यात आलेली असून यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

ट्रॅक्टर अनुदानात मोठी वाढ !

कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे, पावर टिलर इत्यादी अवजारांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे. यामध्ये विशेषता ट्रॅक्टरसाठी पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ट्रॅक्टर 2WD (40 PTO एचपी किंवा अधिक) साठी कमाल अनुदान मर्यादा ही 1.25 लाखावरून आता थेट 4.25 लाख इतकी मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच ट्रॅक्टरच्या इतर मॉडेलमध्ये देखील अनुदानात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आलेली आहे.

राज्यशासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदान वाढीचा हा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे; कारण आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आधुनिक शेतीचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे ट्रॅक्टरशिवाय शेतीतील काम सहजासहजी होणे शक्य नाही. आता शासनाच्या या ट्रॅक्टर अनुदान वाढ निर्णयामुळे प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक असेल.

ट्रॅक्टर अनुदानासाठी कागदपत्र

  • अर्जदारांचा आधारकार्ड
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जमिनीचा 8अ उतारा
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • करारनामा
  • शेतकरी हमीपत्र
  • ट्रॅक्टर जीएसटी बिल
  • इतर कागदपत्र

अर्ज कसा करावा ?

ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलला भेट द्यावी लागेल. त्याठिकाणी सर्वप्रथम नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून संबंधित शेतकऱ्याची संपूर्ण माहिती भरून प्रोफाइल पूर्ण करावी लागेल. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण याघटकांतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलीत अवजार हा पर्याय निवडून शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.

ट्रॅक्टर सोडत यादीत नाव लागलं ? पुढील 7 दिवसात हे काम करा

अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल, त्यासंदर्भातील एसएमएस शेतकऱ्यांच्या नोंदणी करत मोबाईलवरती पाठवण्यात येईल. लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड झाल्यास शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्र महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावी लागतील त्यानंतर पूर्वसंमती पत्र मिळेल. त्यानंतर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा संबंधित अवजार खरेदी करून जीएसटी बिल व इतर आवश्यक कागदपत्र कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांना द्यावे लागतील. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल.

👇👇👇👇👇👇👇👇

Leave a Comment