मधुमक्षिका पालन अनुदान, संपूर्ण माहिती, ऑनलाईन अर्ज : Madhumakshika Palan Anudan Yojana

Madhumakshika Palan Anudan Yojana : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्थैर्य करण्यासाठी शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना, नियोजन, प्रकल्प इत्यादी वारंवार राबविण्यात येतात. शेतकरी शेती व्यवसायासोबतच इतर पूरक व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, हा शासनाचा प्रत्येक योजना सुरू करण्यामागील हेतू असतो. यासाठी शासनाकडून विविध प्रवर्गातील, विविध स्तरातील लाभार्थी नागरिकांना अनुदान दिलं जात.

Madhumakshika Palan Anudan Maharashtra

शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत अशीच एक योजना राबवली जाते. महाराष्ट्र राज्य खाद्य व ग्रामोद्योग महामंडळामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वकांक्षी योजना ज्यामध्ये मध केंद्र योजनेअंतर्गत होतकरू व इच्छुक शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी मोफत प्रशिक्षण त्यासोबत व्यवसाय करण्यासाठी 50% पर्यंत अनुदान दिलं जातं.

राज्यातील डोंगराळ व दुर्मिळ जंगलयुक्त भागातील मधपाळणा शेतीसह इतर पूरक कामातून उत्पन्न मिळावा; म्हणून मंडळ व उद्योग विकास मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना सुरु करण्यात आली. अर्ज निवडीनंतर अर्जदारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येतं. योजनेअंतर्गत शेतकरी स्वतः वैयक्तिकरित्या अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना 10 मधमाशी पेटी या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतात.

योजना नावमधुमक्षिका पालन अनुदान योजना
लाभार्थी राज्यमहाराष्ट्र
लाभ स्वरूप50% अनुदान
लाभार्थीशेतकरी वर्ग
अर्जाची पद्धतऑफलाईन

मधुमक्षिका अनुदान किती व पात्रता ?

 • अर्जदार किंवा लाभार्थी हा शेतकरी असावा.
 • अर्जदार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा.
 • अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक म्हणजेच अर्जदाराच्या स्वमालकीची जमीन असावी.
 • मधुमक्षिकापालन करत असलेल्या परिसरात किंवा क्षेत्र मधुमक्षिकापालनासाठी आवश्यक अशी वनस्पती असावीत.
 • अर्जदारांना मधुमक्षिकापालन संदर्भातील प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं

 • आधारकार्ड
 • बँक पासबुक
 • जमिनीचा 7/12 उतारा
 • जमिनीचा 8अ उतारा
 • प्रशिक्षण प्रमाणपत्र
 • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
 • कमीत कमी 7वी पास असल्याचा दाखला

मधुमक्षिकापालनासाठी अर्ज कुठे करावा ? (Application Process)

Madhumakshika Palan Yojana साठी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी लागेल. कार्यालयात विहित नमुन्यातील अर्जाचा नमुना घेऊन, तो अर्ज सविस्तररित्या भरुन आवश्यक त्या कागपत्राची पूर्तता त्या अर्जासोबत करावी व अर्ज सादर करावा.

Leave a Comment