Pocra DBT : विहीर आणि बोअरवेल पुनर्भरणासाठी मिळवा 16 हजार रुपये अनुदान; आजच अर्ज करा

Pocra DBT : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर किंवा बोरवेलचा पुनर्भरण करण्यासाठी 14 हजारापासून 16 हजार रुपयांपर्यंत अनुदान (Subsidy) दिलं जातं. राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवता येतो, यासाठी त्यांच्या शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे आवश्यक आहे.

विहीर, बोरवेल पुनर्भरण अनुदान

बोरवेल किंवा विहीर काढल्यापासून कालांतराने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत जाते; परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहीर किंवा बोरवेल पुनर्भरण केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. यासाठीच शासनाकडून अनुदान दिलं जातं. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.

राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामधील काही भाग पाण्याअभावी नेहमी टंचाईग्रस्त असतो, अशा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विहिरीचे व बोरवेलचे पुनर्भरण करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे जमिनीची भूजल पातळी वाढवण्यासाठी पुनर्भरण महत्त्वाची भूमिका बजावत असते. यासाठीच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोखरा योजनेचा लाभ गावा-गावातील शेतकऱ्यांना दिला जातो.

लाभ घेण्यासाठी कागदपत्र ?

  • आधारकार्ड
  • जमिनीचा सातबारा
  • आठ-अ उतारा
  • बँक पासबुक
  • इतर कागदपत्रं

Pocra DBT अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेचा लाभ कसा मिळवावा ?

👇👇👇👇

येथे क्लिक करुन पहा !

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना म्हणजेच पोखरा योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर व बोरवेल पुनर्भरणासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदाना संदर्भातील अधिक माहितीसाठी गावातील शेतकरी समूहांनी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक अथवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Comment