इनवेल बोअरिंगसाठी ‘या’ योजनेतून शेतकऱ्यांना शासनाकडून इतकं अनुदान मिळणार, असा करा आँनलाईन अर्ज | Inwell Boring Scheme

शेतकऱ्यांना शेती करत असताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी होय. शेतीसाठी पूरक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास शेतकरी माळरानावरसुद्धा सोन पिकवू शकतो. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून व शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते. सदर योजनेअंतर्गत इनवेल बोअरिंगसाठी शासनाकडून अनुदान दिलं जात. यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Inwell Boring Subsidy Scheme

शेतकरी आपल्या शेतात पाण्याची बारामाही उपलब्धता व्हावी यासाठी विहीर खोदतात; परंतु काही कारणाचं विहिरीला पाणी लागत नाही, परिणामी शेतकऱ्यांचा पैसा वाया जातो. जर विहीर खोदकाम केल्यानंतर विहिरीला पाणी लागलं नसेल, तर अशा परिस्थितीत विहिरीमध्ये आडवे बोअर घेतले जातात. यामुळे विहिरीस पाणी लागण्याची शक्यता असते.

वरील सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत जुन्या विहिरीमध्ये इनवेल बोअरिंगसाठी अनुदान दिलं जात. याकरिता शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या Mahadbt Farmer Login पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो.

Subsidy किती मिळणार?

विहिरीतील इनवेल बोअरिंगसाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना 20,000 रुपये इतका अनुदान देण्यात येतं. सदरची योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर ही जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यासाठी राबविण्यात येते.

इनवेल बोअरिंग लाभार्थी पात्रता

 • लाभार्थी अनुसूचित जात प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार लाभार्थ्यांकडे जातीचा वैध दाखला असणे बंधनकारक आहे.
 • अर्जदाराकडे शेतजमिनीचा 7/12 व 8-अ उतारा असणे आवश्यक आहे.
 • अर्जदारांची वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाखापर्यंत असावी.
 • उत्पन्न दाखला सादर करणे अनिवार्य असेल.
 • लाभार्थी अर्जदारांना कमीत कमी 0.20 हेक्टर आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर पर्यंत जमीन असणे बंधनकारक आहे.

इनवेल बोअरिंगकरिता आवश्यक कागदपत्रे

 • ग्रामसभेचा ठराव
 • जमीन असल्याबाबतचा तलाठी यांच्याकडील दाखला
 • विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र – विहीर चतुरसीमा
 • अपंग असल्यास दाखला
 • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report
 • कृषी अधिकारी यांचा क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • जमिनीचा 7/12 व 8-अ उतारा
 • लाभार्थ्याचे बंधनपत्र (100 किंवा 500 च्या बॉण्ड पेपरवर)
 • तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचा उत्पन्न दाखला
 • ज्या विहिरीवर इनवेल बोअरिंगचे काम करावयाचे असेल, त्या विहिरीचा काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो

ऑनलाइन अर्ज सादर करत असताना लाभार्थ्यांनी वरील सर्व पात्रता व आवश्यक ती कागदपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रापैकी सर्व कागदपत्र अनिवार्य असतील याची लाभार्थी अर्जदारांनी नोंद घ्यावी. कागदपत्रानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज कसा व कुठे करावा यासंदर्भातील माहिती तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

inwell boring online application साठी लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाइन अर्जासाठी 23 रुपये इतका शुल्क आकारण्यात येईल, ज्याची पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा गुगल पे फोन पे च्या माध्यमातून करू शकता. अर्ज करण्यासाठी खालील 3 पद्धतीचा अवलंब करावा.

 • नोंदणी नसेल तर नवीन नोंदणी पोर्टलवर करून घ्यावी.
 • पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर लॉगिन केल्यानंतर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या समोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करावे.
 • पुढील शेवटच्या टप्प्यामध्ये बाब या पर्यायात ईनवेल बोअरिंग हा पर्याय निवडून अंतिम अर्ज दाखल करावा व 23 रु. इतका शुल्क ऑनलाईन भरणा करावा.

Leave a Comment