शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी शासनाकडून 36 कोटी मंजूर : Crop Insurance Update

Crop Insurance Update : शेतकरी मित्रांनो, शासनाकडून काल दिनांक 01 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाअंतर्गत मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके/शेतीजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानी करिता मदत देण्यासाठी 36 कोटी निधी वितरीत करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील थोडक्यात माहिती व शासन निर्णय याठिकाणी आपण पाहूयात.

अतिवृष्टी नुकसान भरपाई 36 कोटी मंजूर

अतिवृष्टी, पुर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (input subsidy) स्वरूपात एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने ठरविण्यात आल्याप्रमाणे मदत देण्यात येते. दिनांक 27 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार अतिवृष्टी, पुर यासारख्या नुकसानीकरिता व इतर नुकसानी करिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

मार्च ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीन मालवत्ता व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्र 1 व 11 येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार एकूण रु. 3593.16 लाख इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे.

पात्र शेतकऱ्यांना लवकरच निधी वाटप

शासन निर्णयात नमूद कालावधीतील पात्र शेतकऱ्यांना लवकरच शासनाकडून निधी वाटप करण्यात येईल. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील प्रत्येक जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याची अमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचं शेतीपिके, शेतजमीन वगळता मालमत्ता व इतर नुकसान झालेला असेल, अशा सर्व शेतकऱ्यांना या शासन निर्णयाचा नक्कीच फायदा होईल.

👇👇👇👇👇👇👇👇👇

कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार याठिकाणी शासन निर्णय पहा !

Leave a Comment