नवयुवक शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ मिळवता यावा, यासाठी राज्यशासनाकडून विविध संस्थांच्या माध्यमातून व कृषी विभागाकडून मोफत प्रशिक्षण देण्यात येत. शेतीपूरक व्यवसाय युवकांना करता, यावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्याकडून मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासंदर्भातीलच थोडक्यात व कामाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
बार्टीकडून मोफत प्रशिक्षण सुविधा
शेतीपूरक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी निःशुल्क प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
प्रशिक्षण सुविधा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तळेगाव दाभाडे, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. या अंतर्गत तरुणांना कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, रोपवाटिका व्यवस्थापन, शेडनेट हाऊस तंत्रज्ञान या विविध शेतीपूरक व्यवसाय संदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणांतर्गत मोफत प्रशिक्षण, निवासी सुविधा व भोजनांचा खर्च बार्टी पुणे संस्थेकडून केला जाईल.
पात्रता व निकष काय असतील ?
सदर प्रशिक्षणाकरिता फक्त अनुसूचित जातीचा विद्यार्थी किंवा युवक अर्ज करू शकेल. अर्जासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे देण्यात आलेली आहे. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा व कमीत कमी आठवी उत्तीर्ण असावा.
📘 हे पण वाचा : सर्वांना पीक विमा मिळणार, शासनाकडून 61 कोटी 92 लाख रु. मंजूर
प्रशिक्षणाचे फायदे : • अनुभवी व पात्र प्रशिक्षक • प्रॅक्टिकल ट्रेनिंग • निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन सुविधा, प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी.

आवश्यक कागदपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- आधारकार्ड
- शाळा, महाविद्यालय सोडण्याचा दाखला
- रहिवासी दाखला
- मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र
प्रशिक्षण वेळापत्रक
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 सप्टेंबर 2023 |
नोंदणीची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2023 |
कागदपत्र पडताळणी | 5 ऑक्टोबर 2023 |
अंतिम यादी | 07 ऑक्टोबर 2023 |
बॅच सुरू होण्याची तारीख | 9 ऑक्टोबर 2023 |
मोफत प्रशिक्षणासाठी संपर्क
राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, सर्वे नंबर 398-400, सी.आर.पी.एफ कॅम्पसजवळ, जुना पुणे – मुंबई हायवे, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे – 410506, महाराष्ट्र
📞 संपर्क :
- 02114-255480/255481
- 9423085894/9423205419
📨 ई-मेल व वेबसाईट :
- www.nipht.org
- htc_td@Yahoo.co.in