PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकाचवेळी 6,000 रु. मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून सर्व शेतकऱ्यांना आज अर्थात 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासनाकडून एकूण 6000 रुपयांची रक्कम आधार सलग्न बँक खात्यावरती मिळणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना आज दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांना 6000 रु मिळणार

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या अनुषंगाने सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली. सदर योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना एकूण 15 हप्ते वितरित करण्यात आलेले असून येणारा सोळावा हप्ता आज दिला जाणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळ येथील एका समारंभात पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता वितरित करणार आहेत. यासोबतच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता अशी एकंदरीत 4000 रुपये इतकी रक्कम राज्य सरकारकडून वितरित केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता दोन्ही योजनेचे मिळून 6000 रुपये शासनाकडून एकाचवेळी आज दिले जाणार आहेत.

पीएम किसान उत्सव दिवस

केंद्र शासनाकडून 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभरात ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ या ठिकाणी कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, कृषिमंत्री धनंजय मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंत इतकी कोटी रक्कम वितरित

देशभरातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाकडून फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना रु. 2,000 चा हप्ता प्रती चार महिन्यांनी दिला जातो. देण्यात येणारी हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. पी एम किसान योजनेअंतर्गत 24 फेब्रुवारी 2024 अखेर राज्यातील 113.60 लाख शेतकरी कुटुंबांना आत्तापर्यंत एकूण 27,638 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.

यवतमाळ येथील PM किसान योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी वितरण समारंभात शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती दर्शविता येणार आहे, त्यासाठी शासनाकडून pmindiawebcast.nic.in ही वेबसाईटची लिंक राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

तुम्हाला हफ्ता (पैसे) मिळणार का? तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment