‘या’ व्यवसायासाठी राज्य शासनाकडून मिळणार 50 टक्के अनुदान; त्वरित याठिकाणी अर्ज करा

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळामार्फत सन 2019 पासून शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्न मिळावा, या अनुषंगाने मधकेंद्र योजना संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात आली. सदर योजनेमुळे शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची एक नवीन संधी महाराष्ट्र शासन करून उपलब्ध करून देण्यात आली. हा एक नाविन्यपूर्ण उद्योग असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालन उद्योगाच प्रशिक्षण दिलं जातं.

योजनेतील प्रमुख घटक व पात्रता

  1. वैयक्तिक मधपाळ : सदर योजनेसाठी अर्जदार साक्षर असावा, अर्जदारांच्या नावाने शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदारांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.
  2. वैयक्तिक केंद्रचालक (प्रगतशील मधपाळ) : या योजनेसाठी किमान अर्जदारांनी दहावी उत्तीर्ण असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावं त्यानंतर व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने किमान 1 एकर शेतजमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

योजनेची वैशिष्ट्ये

सदर योजनेच्या माध्यमातून मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक अश्याप्रकारे योजनेचा स्वरूप असेल. शासनाच्या हमीभावाने मध खरेदी करण्यात येतो तसेच विशेष प्रशिक्षणाची सुविधा देण्यात येते. मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते.

अटी व शर्ती

लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर लाभार्थ्यांनी प्रशिक्षणापूर्वी 50 टक्के स्वगुंतवणूक रक्कम भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदारांना मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी धाराशिव येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय, धाराशिव (द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र), प्रशासकीय इमारत समोर, (दूरध्वनी क्रमांक : 02472 – 222301) धाराशिव – 413501 ई-मेल आयडी : dviosman@rediffmail.com येथे संपर्क साधावा, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सातारा येथील संचालक, मध संचालनालय, सरकारी बंगला 5, महाबळेश्वर, जिल्हा-सातारा, पिन – 412801 (दूरध्वनी : 02168 – 260264) यांच्याशी संपर्क साधावा.

📢 मधुमक्षिका पालन अनुदान संदर्भात संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment