drip irrigation : राज्यशासनाकडून शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करत असताना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी तुषार व ठिबक सिंचन अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतं. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन drip irrigation scheme अंतर्गत तुषार व ठिबक सिंचनासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अनुदान देण्यात येतं. नुकताच केंद्रशासनाकडून सूक्ष्म सिंचनाच्या धोरणात मोठा बदल करण्यात आलेला असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
ठिबक-तुषार सिंचन धोरणात बद्दल
शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवता यावा, यासाठी तुषार किंवा ठिबक सिंचनाचा लाभ घेतल्यानंतर 7 वर्षाऐवजी 3 वर्षाची अट ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता तुषार किंवा ठिबक सिंचनाचा लाभ घेतल्यानंतर परत 3 वर्षांनी त्याच क्षेत्रावर लाभ मिळवता येणार आहे. यापूर्वी तुषार किंवा ठिबक सिंचनाचा परत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7 वर्षे वाट पाहावी लागत असत.
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजना व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमाच्या माध्यमातून अनुदान देण्यात येतं. या योजनेमध्ये पूर्वी एखाद्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाचा लाभ घेतल्यानंतर पुढील 7 वर्षासाठी त्याच क्षेत्रावर शेतकऱ्यांना लाभ मिळवता येत नव्हता; परंतु आता सदर योजनेतील ही बाब कायमस्वरूपी काढून टाकण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना 3 वर्षानंतर सिंचनाचा लाभ घेता येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय
शासनाच्या या निर्णयामुळे ठिबक व तुषार सिंचनासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे. कारण 2 ते 3 वर्षानंतर काही कारणास्तव ठिबक किंवा तुषार उपकरण निकामी झाल्यास शेतकऱ्यांना बाजारात मोठी रक्कम देऊन बाजारातून ही उपकरण खरेदी करावी लागतात; परंतु शासनाकडून आता 7 वर्षाऐवजी 3 वर्षांमध्ये परत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, शेतकऱ्यांना परत 3 वर्षांनी ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी अर्ज करून अनुदान मिळवता येईल.
👇👇👇👇👇👇👇👇
Jilicom? Keeping it simple, I like it! Easy to navigate, decent game selection, and smooth gameplay. Not bad at all! Check it out if you want something straightforward. jilicom
Yo, 123betapp, you guys are alright! The app’s pretty slick, and I haven’t had any issues with withdrawals so far. Keeping my fingers crossed! Check ’em out: 123betapp