e pik pahani last date : ई-पीक पाहणी 2023 शेवटची तारीख, मुदतवाढ

e pik pahani last date : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी मोबाईलच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या 7/12 उताऱ्यावरती विविध पिकांची नोंद करणे आता शक्य झालं आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून मागील रब्बी व खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी योग्य त्याप्रमाणात पिकाची पाहणी केली होती.

नवीन वर्जान आणि सुविधा

यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी मागील वर्षाप्रमाणे चांगला प्रतिसाद देऊन ई-पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्यावी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवावा. त्यामुळे सध्यास्थितीत सुरू असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणीदेखील आपल्याला मागील वर्षाप्रमाणे जवळजवळ 100 टक्के पूर्ण करावयाची आहे. त्यासाठी ई-पीक पाहणीचे नवीन 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

सदरची ई-पीक पाहणी शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे मानण्यात येणार आहे. त्यापैकी किमान 10 टक्के तपासणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येईल. त्यानंतर पुढील 48 तासात खातेदारास स्वतःला ई-पीक पाहणी नोंदीची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सदरच्या ई-पीक पाहणी ऍपद्वारे मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह तीन घटक नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण गावाची ई-पीक पाहणी यादी बघण्याची सुविधासुद्धा नवीन व्हर्जनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मदत कक्ष क्रमांक

नवीन ई-पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांकरिता मदत बटन देण्यात आलेला असून मदत कक्ष क्रमांक 022-25712712 या दूरध्वनी क्रमांकावर देखील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबत काही अडचण निर्माण झाल्यास संपर्क करून आपल्या अडचणीचे निराकरण किंवा निरासन करता येणार आहे.

ई-पीक पाहणी मुदतवाढ प्रेसनोट PDF येथे क्लिक करून पहा !

सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा ई-पीक पाहणी करताना तांत्रिक अडचण येऊ शकते. खरीप हंगाम 2023 ई-पीक पाहणी मोबाईलद्वारे करण्यासाठी 01 जुलै 2023 पासून संपूर्ण राज्यभरामध्ये सुरुवात झाली. राज्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थांचे अध्यक्ष व सचिव, शेतकरी दूध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोखरा प्रतिनिधी, ग्राम रोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य, मीडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्रचालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षा असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

ई-पीक पाहणी शेवटची तारीख | Last Date

खरीप हंगाम 2023 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता 30 ऑगस्ट 2023 ऐवजी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येते, की खरीप हंगाम 2023 मध्ये आपली ई-पीक पाणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पिक विमा, पीक कर्ज, शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

🔔 तुमची ई-पीक पाहणी झाली का ? अशी तपासा तुमच्या मोबाईलवर !

संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामाची पाहणी शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी विविध घटकांनी तसेच सर्व शेतकऱ्यांनी 100 टक्के सहभाग घेऊन ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Leave a Comment