E-Pik Pahani : शेतकरी मित्रांनो ! पीकपेरा नोंदणी केल्यास हे होतात फायदे; तुम्हाला ही माहिती आहे का ?

E-Pik Pahani : शेतातील पिकांची माहिती ऑनलाईन नोंदविण्यासाठी शासनाकडून ई-पीक पाहणीचा प्रकल्प सुरु करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणं एकदम सोप झालं. शेतकऱ्यांना त्यांच्या जवळील मोबाईल ॲपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येऊ लागली; परंतु या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा मिळावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही.

50 टक्के पीकपेरा नोंदणी

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांच नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळत असते. मात्र शेतकऱ्यांनी पिकाची नोंदच केली नाही, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल ? हा प्रश्न उपस्थित होतो. राज्यातील ई-पीक पाहणी किंवा पीकपेरा नोंदणीचा आढावा घेतला, तर जवळपास अद्याप फक्त 55 ते 65 टक्के शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी केली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पीक पाहणी करून भविष्यकाळात आपल्या पिकांचा नुकसान झाल्यास मिळणाऱ्या लाभाचा फायदा घ्यावा. शासनाकडून शेतकऱ्यांना पिक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून आता 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद करता येणार आहे.

पीकपेरा नोंदणी फायदा व नुकसान

📢 फायदा : ई-पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यामध्ये पीक कर्ज, पीकविमा, अतिवृष्टी अनुदान व इतर शासकीय योजनांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणं अनिवार्यच.

🤔 तुमची ई-पीक पाहणी झाली का ? अशी तपासा तुमच्या मोबाईलवर !

📍 नुकसान : एखाद्या शेतकऱ्यानी, जर ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नसेल, तर त्या संबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही; परिणामी ऐनवेळी शेतकरी अडचणीत येऊ शकतो.

ऑनलाईन नोंदणीसाठीच्या अडचणी ?

ई-पीक पाहणीचा फायदा व नुकसानीशिवाय आपण शेतकऱ्यांची बाजूसुद्धा समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे ऑनलाईन नोंदणी करत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या? अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही मोबाईल नाही, तर अनेक शेतकऱ्यांच्या दुर्गम भागात नेटवर्क येत नाही, अनेकवेळा पिकाचा काढलेला फोटो अपलोड होत नाही आणि अपलोड झाला तरी लोकेशन चुकीचा दाखवत, अशा बऱ्याच अडचणी शेतकऱ्यांना सध्या येत आहेत.

एका मोबाईलवर किती नोंदणी ?

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता, बहुतांश शेतकऱ्यांकडे मोबाईल नसतो. या कारणाने शेजारीपाजारी मित्र किंवा इतरांना एकमेकांची ई-पीक पाहणी करता यावी, यासाठी एका मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून 50 शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुभा ई-पीक पाहणी ॲपमध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Comment