Crop Loan : यंदा खरीप, रब्बीला मिळणार वाढीव पीक कर्ज; शेतकऱ्यांना दिलासा !

Crop Loan : खरिपाचा हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात बँकामार्फत पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होईल. बहुतांश शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल की ? यंदाच्या खरीप सालाला पीक कर्ज वाढीव मिळेल की नाही ? तर शेतकरी मित्रांनो, याठिकाणी आपण त्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने पिकाच्या वर्गवारीनुसार म्हणजेच पीक निहाय प्रति हेक्टर पीक कर्ज व पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय इत्यादीसाठी खेळते भांडवल कर्ज वाढविले आहे. राज्यस्तरीय सल्लागार समितीने चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2023-24 साठी पीक कर्जदार निश्चित केलेले असून रायगड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पिकाला कर्ज दिले जाणार आहे.

पीक कर्जाचे हेक्टरी दर निश्चित

शेतकऱ्यांना यंदा पिक कर्जाचे हेक्टरी दर निश्चित करण्यात आलेले आहेत. तुरीला सर्वाधिक 54 हजार रुपये पीक कर्ज, तर मूग, भुईमूग, सोयाबीन यांनाही वाढीव दराने पीक कर्ज मिळणार आहे. खरीप हंगामात बटाटे आणि कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाट्याच आणि कांद्याच उत्पादन घेत असतात. त्यामुळे बटाट्यासाठी 88 हजार 500 रु. तर कांद्यासाठी एक लाख प्रती हेक्टर पीक कर्ज दिले जाणार आहे.

फळ पिकांसाठी किती मिळणार कर्ज ?

फळ पिकांनाही यावर्षी प्रति हेक्टरी वाढीव दराने वाढ करण्यात आलेली असून ही वाढ पूर्वीच्या काही फळ पिकात 10 टक्क्यांनी करण्यात आली आहे. याचप्रमाणे काही पिकात पीक कर्जाची घटसुद्धा झाली आहे. केळी दीड लाख, आंब्याला दोन लाख, नारळाला एक लाख कर्ज मिळणार आहे.

कोणत्या पिकाला किती कर्ज (हेक्टरी) येथे क्लिक करून पहा !

Leave a Comment