या जिल्ह्यातील 93 महसूल मंडळात अग्रीम पिक विमा मंजूर, तब्बल 311 कोटी रुपये मिळणार : Crop Insurance Maharashtra

Crop Insurance Maharashtra : महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा सततचा खंड पडल्यामुळे विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडून अग्रीम पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आवेदन देण्यात आलेली होती. पावसाच्या खंडामुळे पिकाच्या उत्पादनात होणारी घट पाहता, जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांनी आक्षेप नोंदविला आहे; परंतु आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचा अग्रीम पिक विमा देण्यासाठी विमा कंपनी तयार आहे.

या जिल्ह्यासाठी अग्रीम पिक विमा मंजूर

नांदेड जिल्ह्यातील समितीकडून पिकांचे संरक्षण करण्यात आल्यानंतर यामध्ये साधारणता जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकाच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त घट आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आधीसूचना आदेश 28 सप्टेंबर 2023 रोजी लागू केला होता.

या आदेशानुसार सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी अग्रीम पिक विमा पात्र ठरविण्यात आला होता; परंतु विमा कंपन्यांचा आक्षेप पाहता अग्रीम पीक विम्याची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली होती. 19 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीमध्ये प्रत्यक्षात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्याची माहिती समोर आली, त्यामुळे या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सोयाबीन पीक हे अग्रीम पीकविम्यासाठी विमा कंपनीकडून मान्य करण्यात आलं.

नांदेड अग्रीम पीकविमा आढावा

  • जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळ : 93
  • अग्रीम विम्यासाठी पात्र महसूल मंडळ : 93
  • सोयाबीन पिक विमाधारक : 8.50 लाख
  • मिळणारी अग्रीम रक्कम : 311 कोटी रु.

तर आता नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच तब्बल 93 महसूल मंडळातील सर्वच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा लवकरच वाटप केला जाणार आहे. वाटप करण्यात येणाऱ्या एकूण निधीचा आकडा जवळपास 311 कोटी इतका आहे.

📢 या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा लवकरच मिळणार

Leave a Comment