Insurance company denied to provide insurance amount to farmer in some cases of some districts; but some districts under capable so these districts will get Crop Insurance Soon.
Agro Crop Insurance : पिक विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाच्या विविध विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत, पिक विमा अग्रीम दावे अधिक क्लिष्ट असतात, त्यामुळे अग्रीम पीकविमा वाटपासाठी वेळ लागत आहे. आगाऊ भरपाई बाबत विभागीय आयुक्तांचा निर्णय सुद्धा विमा कंपन्यांना मान्य नव्हता, यामुळे विमा कंपन्यांनी हागाऊ नुकसान भरपाईच्या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे दाद मागणार आहेत. याच संदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी झालेली असून त्याबद्दलची माहिती आपण याठिकाणी पाहूयात.
अग्रीम पीकविमा सुनावणी
बीड, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा देण्यासाठी दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी झालेली असून दरम्यान कृषी मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली की, विमा कंपन्या सांगली, कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यात आगाऊ रक्कम भरण्यास तयार आहेत. म्हणजेच आता परभणी, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आगाऊ रक्कम भरण्यास पात्र असलेल्या मंडळांना लवकरात लवकर अग्रीम पिक विमा देण्यात येईल. पुढील काही दिवसात या मंडळातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ रक्कम जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
राज्यातील एकूण 24 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ विमा भरपाई रक्कम देण्याचे आदेश दिले होते; परंतु विमा कंपन्याकडून यासाठी नकार देत विभागीय आयुक्ताकडे दाद मागण्याचे आपल्याला निदर्शनास आले; मात्र विभागीय आयुक्तांकडून आगाऊ रक्कम संदर्भातील दाद फेटाळण्यात आली. पिक विमा कंपन्या नियमाला अनुसरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाहीत, कारण नियमानुसार 21 दिवस पावसाचा सतत खंड पडल्यास शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम द्यावी लागते.
इतर जिल्ह्यांच काय ?
बीड, बुलढाणा व वाशिम जिल्हासंदर्भात विभागीय आयुक्तांचा आदेश न पाळता विमा कंपनीने सरचिटणीसकडे अपील केले आहे. इतर जिल्ह्याच्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची माहिती आणि पडताळणी विमा कंपनी स्तरावर केली जात आहे. त्यामुळे या संदर्भातील निकाल सुद्धा लवकरच लावण्यात येईल. यामध्ये विमा कंपन्या ज्याठिकाणचा ऑर्डर स्वीकारतील तेथे प्रकरणाचे निराकरण केले जाईल. परंतु ज्याठिकाणी आदेश नाकारला जाईल त्याठिकाणी अपील प्रक्रिया सुरू असेल.
📣 25 टक्के अग्रीम पिक विमा त्वरित शेतकऱ्यांना वितरित करण्याचे आदेश
अपील केल्यानंतर सचिव स्तरावर सुनावणी होईल, त्यानंतर अंतिम निर्णय राज्यशासनाचे असून शेतकरी, जर कंपनी सचिवांच्या निर्णयावर समाधानी नसेल, तर केंद्राकडे अपील करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक निर्णय लवकर घेता येतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढणे सोपे होईल. पीक विमा कार्यक्रमात बदल करण्याची शेतकऱ्याची मागणी केली जात आहे.