शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी दिवसभर वीज मिळणार, गावची यादी पहा (Agriculture Electricity)

Agriculture Electricity : शेतकऱ्यांसाठी विजेचा प्रश्न काही नवीन नाही, शेतात भरघोस उत्पन्न मिळवायचा असेल, तर सिंचनासोबत शेतकऱ्यांना विजेची सुविधासुद्धा उपलब्ध असणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या योजनेच्या माध्यमातून 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा

पुणे जिल्ह्यात 221 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प “मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0” अंतर्गत उभारण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी शासन व महावितरण विभागाकडून सुरू करण्यात आलेली असून हा प्रकल्प साधारणता 1091 एकर जमिनीवरती व्यापला जाईल. 30 वर्षाच्या भाडेतत्त्वावर शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि दिवसा वीज उपलब्ध होईल. या प्रकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायरान जमिनीच्या हस्तांतरणासाठी महावितरण कंपनीला महत्त्वपूर्ण सहकार्य करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीही या प्रकल्पासाठी मोठा हातभार लावला आहे. बारामती मंडळात 23 उपकेंद्राच्या स्थापनेसाठी महावितरण एकूण 586 एकर जमीन संपादित केली आहे.

या प्रकल्पाचे मुख्य फायदे

  • शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यास मदत होईल.
  • शेतीसाठी चालणारा सिंचन पंप शेतकऱ्यांना कोणत्याही वेळी वापरता येईल.
  • 24 तास पिकाला पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे, नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
  • शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होणार

पहिल्या टप्प्यात 2023-24 या चालू वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार असून उर्वरित प्रकल्प 2024-25 मध्ये पूर्णत्वास करण्यात येणार. शासनाच्या या निर्णयामुळे बारामती मंडळातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसांनी पुरवठा मिळायला सुरुवात होईल.

🔔 प्रधानमंत्री पिक विमा योजना यादी ऑनलाईन कशी पहावी? येथे क्लिक करून पहा !

Leave a Comment