खरीप पीक विमा यादी महाराष्ट्र अशी पहा : Kharip Pik Vima List Maharashtra

Kharip Pik Vima List : शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येते. सदर योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा दिला जातो, म्हणजेच शेती पिकाचे जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई म्हणून परतावा रक्कम दिली जाते. बहुतांश शेतकऱ्यांना परतावा रक्कम मिळत नाही किंवा रक्कम किती मिळाली यासंदर्भात माहिती नसते.

Pik Vima Yadi Maharashtra

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पिकविमा किती मिळाला ? या संदर्भातील अधिक माहितीसाठी विमा यादी पहावी लागते, तर महाराष्ट्रातील पिक विमा यादी नेमकं कश्या पद्धतीने बघावी ? याबद्दलची थोडक्यात पण कामाची माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर महाराष्ट्रातील पिक विमा लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल, म्हणजेच राज्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना किती विमा मिळाला ? या संदर्भातील यादी बघायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. महाराष्ट्रातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरित केल्यानंतर त्यांची यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात येते. ही यादी तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.

पिक विमा यादी कशी बघावी ?

सध्यास्थितीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 2019 मध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये कापूस, कांदा व तूर उत्पादक शेतकऱ्यांची यादी देण्यात आलेली आहे.

तुम्हाला इतर वर्षांची म्हणजेच 2021-22 किंवा 2022-23 पिक विमा यादी हवी असेल, तर ती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. यादी उपलब्ध झाल्यानंतर त्या संदर्भातील माहिती आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी देत असतो. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. त्यासंदर्भातील अपडेट आल्यानंतर आम्ही ग्रुपवरती माहिती देऊ.

🌾 पिक विमा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “खरीप पीक विमा यादी महाराष्ट्र अशी पहा : Kharip Pik Vima List Maharashtra”

Comments are closed.