शिलाई मशीन झेरॉक्स मशीन 100 टक्के अनुदानावर मिळणार, समाजकल्याण विभागाकडून योजना सुरू

महिलांसाठी उपयुक्त अशी घरगुती शिलाई मशीन व लघुउद्योग करण्यासाठी आवश्यक अशी झेरॉक्स मशीन या दोन्ही उपकरणासाठी समाजकल्याण विभागामार्फत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. याबद्दलची अधिक माहिती जश्याप्रकारे अर्जाची प्रक्रिया, कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज इत्यादी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

शिलाई मशीन झेरॉक्स मशीन 100% अनुदान

जालना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विविध कल्याणकारी योजनेमधील त्याचाच एक भाग म्हणून लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन वाटप केली जात आहे. झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन वाटपासाठी लाभार्थी अर्जदारांना शेवटची तारीख 31 मार्च 2024 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीत लाभार्थ्यांनी आपला अर्ज सादर करावा.

दिव्यांग व्यक्ती, मागासवर्गीय लाभार्थी यांची सामाजिक स्थिती पाहता, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती सुधारावी, या विचाराने शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. याच धरतीवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून 100 टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन शिलाई, मशीनसाठी अनुदान मिळते. याद्वारे लाभार्थी व्यक्ती स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक प्रगती साधू शकतात, हा प्रशासनाचा हेतू आहे. यासाठी लाभार्थी वर्गांकडून 31 मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

 • जातीचा दाखला
 • दिव्यांग प्रमाणपत्र
 • अर्जदारांचा आधारकार्ड
 • पॅन कार्ड
 • रहिवासी दाखला
 • ग्रामसभेचा ठराव
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • इतर आवश्यक कागदपत्रे

झेरॉक्स शिलाई मशीनसाठी पात्रता

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानासाठी शासनाकडून देण्यात आलेली काही निश्चित पात्रता धारण करणे आवश्यक आहे. योग्य पात्रता धारण करत असलेल्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल, अर्जामध्ये कोणतीही त्रुटी अथवा इतर चुकीची कागदपत्र आढळून आल्यास लाभार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येईल.

silai machine Yojana Maharashtra

 • फक्त मागासवर्गीय व दिव्यांग व्यक्तींनाच सदर योजनेसाठी अर्ज करता येईल.
 • खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नसून केवळ मागासवर्गीय व दिव्यांगासाठी आहे, याची दक्षता अर्जदारांनी घ्यावी.
 • अर्जदारांचे वय 18 ते 60 वर्षातील असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी अर्जदारांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाखाच्या आत असावी.
 • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावेत.
 • समाजकल्याण विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून शिलाई व झेरॉक्स मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

अर्ज प्रक्रिया व शेवटची तारीख

संबंधित योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना समाज कल्याण विभाग कार्यालयात आपला अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर करण्यासाठी विभागाकडून शेवटची तारीख 31 मार्च 2024 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच अर्जदारांनी अर्ज सादर करावा, त्यानंतर सादर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची अर्जदारांनी दक्षता घ्यावी.

👇👇👇👇👇👇👇👇

सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment