मार्च किंवा एप्रिल महिन्यात “या” जातीच्या ऊसाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मिळणार भरघोस उत्पन्न !

Sugarcane Cultivation : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शेतकरी ऊसाची लागवड करतात. महाराष्ट्रात उत्पादित होणारा ऊस एक नगदी पीक असून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर दिसून येते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागवड करत असताना विविध बाबींचा विचार करावा लागतो, यामध्ये विशिष्ट जातीच्या उसाची लागवड जमिनीनुसार, वातावरणानुसार व इतर गोष्टींचा विचार करून केली जाते.

भरघोश उत्पन्नासाठी विशिष्ट जात

या लेखाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी विशिष्ठ अश्या उसाच्या जातीची माहिती पाहणार आहोत. ज्या उसाची शेतकरी चालू हंगामात म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यात लागवड केल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतो. पंजाब कृषी विद्यापीठाकडून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी पीबी 434 या विकसित जातीची उत्पत्ती करण्यात आली आहे.

पीबी 434 हे पंजाब कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेले सुधारित वाण असून या जातीची लागवड शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन मिळवून देणार आहे. PB 434 जातीचा ऊस आकाराने खूपच जाड व उंच असतो. यामुळे उसाचे वजन ही अधिक असते. उसाची लांबी साधारणता 12 ते 15 फुटापर्यंत असून या जातीच्या उसाचे पीक विविध रोगांसाठी प्रतिकारक आहे.

इतर गुणधर्म व वैशिष्ट्य

पीबी 434 जातीच्या ऊस पिकात अधिक फुटवे पाहायला मिळतात. याचप्रमाणे सदर जातीपासून अधिक साखरेचा उतारा साखर कारखान्यांना मिळू शकतो. संबंधित जातीच्या उसाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकते, असा दावा केला जात आहे. PB 434 जातीच्या उसाच्या उत्पादनाबाबत माहिती अशी की, पंजाब कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या नवीन जातीपासून शेतकऱ्यांना तब्बल 450 ते 650 क्विंटलपर्यंतचे उत्पादन मिळू शकते.

शेतकऱ्यांनकडून PB 434 या जातीच्या ऊसाची मार्च किंवा एप्रिल महिन्यात लागवड केल्यास त्यांना चांगल उत्पादन मिळु शकणार आहे. चालू काळ या जातीच्या लागवडीसाठी उत्तम काळ मानला जात आहे. या जातीपासून 650 क्विंटलपर्यंतचे दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकणार असल्याचा दावा तज्ञांनी केला असल्यामुळे उसाची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

🔔 नमो शेततळे योजना राबविण्यात येणार, 7300 नवीन शेततळ्यांना मंजुरी

तथापि, ऊस पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य नियोजन देखील करावे लागते. त्यामुळे जर या जातीपासून चांगले दर्जेदार उत्पादन शेतकऱ्यांना मिळवायचे असेल, तर ऊस पिकाचे योग्य नियोजन त्यांना करावे लागणार आहे.

Leave a Comment