Cotton Rate : कापूस विक्रीला जोरात सुरुवात प्रति क्विंटल कापसाला इतकं भाव ! बघा कापसाला किती बाजारभाव चालू आहे ?

Cotton Rate : शेतकरी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर मेहनत करून विविध पिकांची लागवड करत असतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुख्यत्व कापसाची लागवड केली जाते. कपाशी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळत आहे का? कापूस विक्रीला सुरुवात झालेली असून प्रति क्विंटल शेतकऱ्यांना सध्यास्थितीत म्हणजेच आजचाभाव किती मिळत आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

आजचा कापूस बाजारभाव

पैठण तालुक्यातील पाचोडी आठवडी बाजारात नवीन कापसाची विक्री होण्यास सुरुवात झालेली असून रविवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर 2023 रोजी साधारणता: कापसाचा भाव 7 हजार 100 रुपये इतका होता. पाचोडीसह इतर भागात मुसळधार पावसाची ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात हजेरी लागल्यामुळे खरीप पिकांना चांगला फटका बसला. फटका बसून सुद्धा कपास लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कंबर कसून कपाशी या पिकाला जगवलं.

सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कापूस वेचणी सुरू आहे. बाजार सुरू झालेला असून रविवारी काही शेतकऱ्यांनी नवीन काढून आणलेला कापूस विक्रीसाठी बाजारात घेऊन आला असता खाजगी व्यापाऱ्यांकडून त्यांना 7 हजार 100 रु. प्रतिक्विंटल हा भाव मिळाला. कापसाचा आणखी भाव वाढेल, अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

एकरी कापूस उत्पन्न

जर एखाद्या शेतकऱ्यांनी एक एकर क्षेत्रात कापूस पिकवला, तर त्याची किंमत साधारणपणे 40,000 ते 45,000 हजार असते. दुसरीकडे असमाधानकारक भाव आणि सततची कापसाची होणारी चोरी, यामुळे कापूस पिकावर होणारा खर्च भागवणे शेतकऱ्यांसाठी खूपच कठीण झाले आहे – सुनील येवले,कापूस शेतकरी

कापूस उत्पादनासाठी येणारा खर्च

प्रक्रियालागणार खर्च
नांगरत2400 रु.
रोटा2200 रु.
सरी1500 रु.
बियाण ( 2पिशवी)1600 रु.
मजुरी (वृक्षारोपण)800 रु.
खत10,000 रु.
खुरपणी10,000 रु.
फवारणी10,000 रु.

साधारणता: वरील रखाना पाहिल्यानंतर आपल्याला कापसासाठी लागणारा अंदाजीत खर्च लक्षात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाचा भाव वाढीव मिळालाच पाहिजे. आता कापसाचा भाव वाढेल का नाही? यासंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल; अन्यथा कापूस चालू बाजार भावात विकावा लागेल.

📢 विविध शेतकरी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment