Solar Pump Yojana : कुसुम सोलरपंप योजनेत महाराष्ट्र आघाडीवर, तर या राज्याचा दुसरा क्रमांक

Solar Pump Yojana : शेतकऱ्यांना रात्रपाळी न करता दिवसा पिकांना पाणी देण्यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने केंद्र सरकारकडून कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली. सदर योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7,100,958 सौरपंप बसविण्यात आलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित करारातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं.

सोलरपंप योजना महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालय 2019 ते 2023 या कालावधीसाठी पंतप्रधान कुसुम सौर योजना राबविण्यात येत असून देशभरातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत 9 लाख 46 हजार सौरपंप बसविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यापैकी देशभरात 2 लाख 72 हजार 916 सौरपंप बसविण्यात आलेले असून सर्वाधिक सौरपंप बसवण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता पाहता महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणावर सौरपंप बसविण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांची शेतीशी असलेली निकटता व गरज पाहता महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक सौरपंप बसविण्याचा मान कदाचित मिळालेला असेल, असं बोलण्यास काहीच हरकत नाही.

सौर पंपासाठी हा राज्य दुसऱ्या क्रमांकावर

केंद्र शासनाकडून महाराष्ट्रात 2 लाख 25 हजार सौरपंप बसविण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात सध्या 71 हजार 958 सौर पंप बसविण्यात आले असून केंद्राने हरियाणामध्ये 2 लाख 52 हजार सोलार पंप बसविण्यास मान्यता दिली आहे, ज्यामध्ये 64 हजार 919 पंप बसविण्यात आले आहेत. या पाठोपाठ राजस्थानमध्ये 1 लाख 98 हजार सौरपंपास मंजुरी मिळालेली असून त्यापैकी 59 हजार 732 पंप राजस्थान सरकारकडून स्थापित करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 66,842 सौर पंप बसवण्यासाठी मनुष्यबळाचे गुंतवणूक केली जात आहे, तर 31 हजार 735 सौरपंप बसविण्यात आले आहेत.

👇👇👇👇👇👇👇👇

सोलरपंप योजना जिल्हानिहाय नवीन पात्र लाभार्थी पहा

Leave a Comment