Good news for farmers ! CM Solar Scheme Servey Started, So Soon farmers will get benefit of Kusum solar pump scheme.
Solar Pump : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना ज्याला आपण कुसुम सोलरपंप योजना असं सुध्दा म्हणतो, ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज करून संबंधित अर्जासाठीची रक्कम (कोटेशन) भरलेली असेल; परंतु अद्याप त्यांना वीजजोडणी करून देण्यात आलेली नाही, अश्या सर्व शेतकऱ्यांना सोलारपंप देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना लवकर पंप उपलब्ध
विज जोडणीसाठी कोटेशन भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता सोलर पंपासाठी नवीन नोंदणी (Solar New Registration) सुरू केली जाणार आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी; म्हणून राज्य शासन शेतकऱ्यांसाठी सौर कृषीपंप योजना मागील काही वर्षापासून राबवीत आहे.
सौर कृषीपंपाचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केलेला होता; अश्या अर्ज केलेल्या परंतू प्रतीक्षेत असलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना कृषीपंपाद्वारे जोडणी दिली जाणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज करून कोटेशन भरलेला असेल; परंतु अद्याप त्यांना वीजजोडणी देण्यात आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना वीज कनेक्शनऐवजी सोलरपंप देण्याचा धोरण निश्चित करण्यात आला आहे.
नवीन सोलरपंप नोंदणी सुरु
विज जोडणीसाठी अर्ज करून कोटेशन भरलेल्या प्रलंबित शेतकऱ्यांना सोलार जोडणीसाठी इच्छुक असल्याची माहिती विचारून त्यांना नवीन सोलारपंप जोडणीसाठी नोंदणी करता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणकडे कोटेशन भरलेला असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांना महावितरणकडून सोलरपंप जोडणीसाठी मेसेज पाठवण्यात येत आहेत.
महावितरणच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी संबंधित महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर जाऊन कोटेशन भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अर्जाची नोंदणी करता येणार आहे.
📑 प्रलंबित शेतकऱ्यांनी सोलरपंप नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा
सोलरपंपासाठी नोंदणी कशी करावी?
- सर्वप्रथम वरील लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ग्राहक क्रमांक (वीजबिल क्रमांक) टाकावा लागेल.
- त्यानंतर ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर नोंदणी या बटणावर क्लिक करा. आता एक नवीन अर्ज भरण्यासाठी पेज उघडेल.
- त्याठिकाणी शेतकऱ्यांची सर्व मूलभूत माहिती दाखवली जाईल, त्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलारपंप घेण्यास इच्छुक आहात का ? असा प्रश्न असेल.
- तुम्ही इच्छुक असाल तर होय किंवा इच्छुक नसाल तर नाही या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमची नोंदणी अशा पद्धतीने संपूर्णता पूर्ण झालेली असेल. तुम्ही संपूर्णतः सौरपंप घेण्यासाठी इच्छुक आहात.
- त्यानंतर तुमची सोलर पंप देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
- इच्छुक या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल, ज्यामध्ये तुमचे व्हेरिफिकेशन केले जाईल.