Solar Panel Scheme : शासनाकडून जनसामान्यांनागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आता वीज बिलापासून सुटका मिळावी, यासाठी शासनाकडून अनुदान तत्त्वावर सौर पॅनल वाटप केलं जात आहे; कारण सध्यास्थितीत देशामध्ये विजेच संकट आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. एकीकडे वीज प्रकल्पांना कोळशाचा तुटवडा, तर दुसरीकडे कडाक्याच्या उन्हामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी लोकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे विजेच्या संकटावर मात करण्यासाठी हरित ऊर्जा (Green Energy) खूपच उपयुक्त ठरतं आहे.
⚡ अनुदान कश्याप्रकारे मिळणार ? येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा
शासनाच्या सदर सोलर पॅनल योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरावरील छतावर सोलार पॅनल बसवून घरासाठी असलेली आवश्यक वीज निर्मिती करू शकता. यासाठी तुम्हाला शासनाकडून अनुदानसुद्धा दिलं जाणार आहे, ज्यामुळे तुमचा लाईट बिलासाठी येणारा दैनंदिन खर्च कमी तर होईलच; परंतु आयुष्यभरासाठी तुम्हाला सोलर पॅनल सबसिडीवरती मिळेल. यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा लागेल ? कागदपत्र कोणते लागतील ? सबसिडी किती मिळेल? यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहूयात
जर तुम्हाला सौर पॅनल बसवायचा असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम तुमच्या घरासाठी किती वीज लागेल हे समजून घेणं महत्त्वाचा आहे. तुमच्या घरातील विजेवर चालणारी एकूण किती उपकरण आहेत ? त्यासाठी किती किलोवॅट वीज खर्च होतो ? या सर्व गोष्टीचा अंदाज बांधून आपल्याला गरजेनुसार 1 वॅट, 3 वॅट, 5 वॅट याप्रमाणे सोलर पॅनलसाठी अर्ज करून सोलर पॅनल खरेदी करावा लागेल.
🔔 तरुणांना मिळतय 5 लाखापर्यंत भांडवली कर्ज; पहा अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
समजा तुमच्या घरात 2-3 छताचे पंखे, एक फ्रीज, 6-8 एलईडी बल्ब, पाण्याची मोटर, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरण आहे, तर अशा परिस्थितीत तुम्हाला रोज कमीत कमी 6 ते 8 युनिट वीज लागेल. त्यानुसार तुम्ही 3 किंवा 5 किलोवॅट सौर पॅनलसाठी अर्ज करू शकता. अनुदानसुद्धा तुम्हाला त्याप्रमाणेच देण्यात येईल ही बाब लक्षात घ्यावी.
⚡ अनुदान कश्याप्रकारे मिळणार ? येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा