गटाचा नंबर टाकून तुमच्या शेत जमिनीचा नकाशा घरबसल्या मोबाईलवर पहा

MP Land Record : शेतकरी मित्रांनो, शेतीशी निगडित सातबारा उतारा, जमिनीचा 8-अ उतारा, फेरफार, चतुरसीमा या विविध कागदपत्रांची आपल्याला वेळोवेळी अत्यंत आवश्यकता भासते; परंतु या कागदपत्रपैकी आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे आपल्या शेतजमिनीचा नकाशा. तर शेतजमिनीचा नकाशा कसा पाहावा ? यासाठीची काय प्रक्रिया आहे ? आपण ऑनलाईन नकाशा पाहू शकतो का ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती सदर लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

शेतजमिनीचा नकाशा (महाभुलेख नकाशा)

शेतजमिनीच्या नकाशाचा वारंवार वापर होत नसला, तरी आपल्या माहितीस्तव व अन्यकारणासाठी शेतकऱ्यांनी सतत आपल्या जमिनीचा नकाशा पाहत राहावा. नकाशाच काम सामान्यतः तेव्हाच पडतं, जेव्हा आपल्याला आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता भासते किंवा आपल्या जमिनीची हद्द पाहिजे असते, त्यावेळी जमिनीचा नकाशा मोलाची भूमिका बजावतो.

ऑनलाइन नकाशा पाहण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांना आता नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्याठिकाणी शेतकरी आपल्या शेताचा गट क्रमांक टाकून एकदम सोप्यापद्धतीने फक्त 5 मिनिटात पीडीएफ स्वरूपात आपल्या जमिनीचा नकाशा उपलब्ध करून घेऊ शकतात.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहावा ?

1) ऑनलाइन जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर खालीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसेल.

2) वरीलप्रमाणे डॅशबोर्ड तुम्हाला दिसल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या तीन लाईनवर क्लिक करा. त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संबंधित जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्यावा लागेल.

3) वरील प्रत्येक पर्याय निवडत असताना डेटा लोड होण्यासाठी काही वेळ लागतो, त्यामुळे त्याठिकाणी थांबा. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला Search By Plot Number हा पर्याय दिसेल, त्याठिकाणी तुमच्या जमिनीचा गट क्रमांक टाकून घ्या.

4) गट क्रमांक टाकल्यानंतर पुढील सर्च आयकॉनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक कळ्या रंगाची टॅब ओपन होईल. ज्यावर तुमच्या सातबाऱ्यावरील खातेधारकांची नावे दाखवली जातील.

5) खातेधारकांची नावे बघत असताना सर्वात खाली आल्यानंतर Map report हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.

6) वरील नमूद पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन पेज एवढे उघडेल, ज्याठिकाणी तुम्हाला निळ्या अक्षरात download file असा एक बटन दिसेल.

7) त्या बटनावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या संबंधित गटाचा नकाशा म्हणजेच तुमच्या गटाचा जमिनीचा नकाशा पीडीएफ स्वरूपात तुमच्यासमोर डाउनलोड होईल. तो तुम्ही पाहू शकता किंवा संबंधित इतर शेतीविषयी कामासाठी वापरू शकता.

8) तर अशाप्रकारे एकदम सोप्यापद्धतीने आपण घरबसल्या मोबाईलवर आपल्या शेतजमिनीचा गट नंबर टाकून नकाशा पाहू शकतो. शासनाकडून सुरू करण्यात आलेली ही जमिनीचा नकाशा पाहण्याची सुविधा खूप शेतकऱ्यांना नक्कीच लाभदायक ठरणार आहे.

गटाचा ऑनलाईन नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment