शेतजमीन मोजणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज असा करा ! Land Record Measurement

महाराष्ट्रात शेतजमिनी संदर्भात मोठ्या प्रमाणावर वाद असताना आपल्याला दिसून येतात. असा वाद निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतजमिनीची मोजणी करणे अनिवार्य होते. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांना शेतजमीन मोजण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा ? याबद्दलची अधिक माहिती नसते, तर मित्रांनो, याठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. शेतजमीन मोजणी अर्जासंदर्भात सविस्तर माहिती. शेतजमीन मोजणीसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज कसा करावा ? याचा नक्कीच बहुतांश शेतकऱ्यांना फायदा होईल.

शेतजमीन मोजणी अर्ज

शेतीतील सर्वात जास्त भांडण होण्याचे मुख्य कारण म्हणजे शेताचा बांध होय. शेताच्या बांधामुळे शेजारी-शेजारी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे असा वाद वेळीच टाळण्यासाठी जमिनीची मोजणी करून शेतातील बांध निश्चित केल्यास शेतातील वाद नक्कीच कमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी शेतजमीन मोजणीचा अर्ज कसा करावा? यासंदर्भातील माहिती आवश्यक आहे.

शेत जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे अर्ज करावयाचा असल्यास दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत. यामधील सुरुवातीची पद्धत ऑफलाईन असून दुसऱ्या पद्धतीने शेतकरी अधिकृत संकेतस्थळावर मोजण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात. दोन्ही पद्धतीसाठी लागणारी वेळ व खर्च सारखाच असेल; परंतु ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास कोणत्याही कार्यालयास भेट देण्याची आवश्यकता भासणार नाही.

शेतजमीन मोजणी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

  • शेतजमीन मोजणी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी – येथे क्लिक करा
  • भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर उघडेल.
  • वेबसाईटच्या निळ्या रंगाच्या नेव्हिगेशन बारवरील डाउनलोड या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर मोजणी या लिंकवर क्लिक करून संबंधित मोजणीचा अर्ज तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये डाऊनलोड करून घ्या.
  • डाउनलोड झालेल्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून तुमच्या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयास सादर करा.

अर्ज करताना ही कागदपत्र लागतील

शेतजमीन ऑनलाईन अर्ज करत असताना शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्र ऑनलाइन अपलोड करावी लागतील. यामध्ये अर्जदारांचा फोटो व सही त्यानंतर ज्या शेतजमिनीची मोजणी करावयाची असेल, त्या जमिनीचा 7/12 व 8 अ उतारा मागील तीन महिन्यातील असावा. ही सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून अर्जदार त्यांचा अंतिम अर्ज पेमेंट करून दाखल करू शकतात.

शेतजमीन ऑनलाईन मोजणी अर्ज

  • शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणीचा ऑनलाईन अर्ज भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर करावा लागेल.
  • भूमि अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर अर्जदारांना डाव्या बाजूला ई-मोजणी असा पर्याय दिसेल.
  • ई-मोजणी या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लॉगिन करून आपल्या संबंधित गटासाठी ऑनलाईन मोजणीचा अर्ज करता येईल.
  • ऑनलाइन मोजणीचा अर्ज करताना काही मूलभूत आवश्यक माहिती, कागदपत्र व जमिनीच्या क्षेत्रफळानुसार मोजणीची फीस ऑनलाईन देय करावी लागेल.

वरील दोन्ही पद्धतीने शेतकऱ्यांना शेत जमीन मोजणीसाठी अर्ज करता येईल. जर तुम्हाला स्वतःला वैयक्तिक शेतजमीन मोजणीची गरज असेल किंवा तुमच्या शेजारील शेतकऱ्यांना शेतजमीन मोजणीची गरज असेल व बांधाचे वाद कायमचे मिटवायचे असतील, तर वरील माहिती तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

जमीन मोजणी आँनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment