शबरी घरकुल योजना 2024 मधील नवीन जीआर आला ! शहरी भागासाठीसुद्धा घरकुल अर्ज नमुना PDF मध्ये उपलब्ध

शबरी घरकुल योजनासंदर्भात शासनाकडून एक महत्त्वपूर्ण नवीन जी.आर म्हणजेच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संबंधित शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली शबरी घरकुल योजनेसंदर्भातील नवीन माहिती याठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. शासन निर्णय या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे. PDF स्वरूपातील शासन निर्णय डाउनलोड करून संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता.

शबरी घरकुल योजना 2024 GR

तुम्हाला जर माहित नसेल शबरी घरकुल योजना काय आहे, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसेल किंवा कुडामातीच्या घरामध्ये, पत्राच्या घरामध्ये किंवा झोपडीमध्ये राहात असतील, तर अशा नागरिकांना सदर घरकुल योजनेचा लाभ शासनाकडून शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून देण्यात येतो. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना शासकीय अनुदानावर घरकुल दिलं जातं.

शबरी घरकुल योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील गरजू नागरिकांसाठी राबविण्यात येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु ही योजना ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागामध्ये प्रभावीपणे राबविण्यात आलेली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते, त्यामुळे यामध्ये आता महत्त्वकांक्षी असा बदल करून यापुढे शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी नगरविकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

शबरी घरकुल योजना पात्रता

  • अर्जदार अनुसूचित जमातीतील असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या स्वतःच्या मालकी हक्काचे पक्के घर नसावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असून अर्जदारांचा कमीत कमी महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षाचा असावा.
  • घर बांधकाम करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जागा नसेल, तर शासनाकडून देण्यात आलेली जमीन असावी.
  • संबंधित योजनेचा लाभ मिळवत असताना किंवा अर्ज करत असताना अर्जदारांची एकूण वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांच्या स्वतःच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

शबरी घरकुल योजना अनुदान प्रक्रिया

शबरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारी एकत्रित लाभाची रक्कम 2.50 लाख रुपये इतकी असेल, ही रक्कम लाभार्थी अर्जदारांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल. सर्वात प्रथम पहिला टप्पा घरकुल मंजुरीचा – घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर 40,000 रु. देण्यात येतील.

8 जिल्ह्याची नवीन घरकुल यादी आली ! यादीत तुमचं नाव आहे का पहा ?

दुसरा टप्यात निधी मिळविण्यासाठी घराचे बांधकाम प्लिंथ लेव्हलपर्यंत असणे आवश्यक आहे, तरच दुसऱ्या टप्प्यातील 80,000 रु. लाभार्थ्यंना मिळतील. तिसऱ्या टप्प्यासाठी घराचे बांधकाम लिंटल लेवलपर्यंत असणे आवश्यक आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील लाभार्थीला 80,000 हजार रु. मिळतील आणि सर्वात शेवटी घर बांधकाम पूर्ण झाल्यावर 50,000 हजार रु. लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.

शबरी घरकुल योजना कागदपत्रे

  • अर्जदारांचा आधारकार्ड
  • राशनकार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • रहिवाशी दाखला (Residence Certificate)
  • मोबाइल क्रमांक
  • मर्यादित उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा ७/१२ व ८अ उतारा
  • ग्रामपंचायत नाहरकत प्रमाणपत्र

शबरी घरकुल योजना अर्ज प्रक्रिया

शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला संपूर्ण अर्जाचा नमुना सर्व आवश्यक कागदपत्रासह भरून घ्यावा लागेल. भरण्यात आलेला अर्जाचा नमुना अर्जदारांना अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशः, टपाल आणि किंवा ई-मेलच्या माध्यमातून सादर करावा लागेल.

अर्जाचा नमुना व शासन निर्णय (GR)

शबरी आवास योजनेचा अर्जाचा नमुना मागील निधी वाटपाचा शासन निर्णय व चालूमधील शासन निर्णय खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे. तुमच्या मोबाईलवरती पीडीएफ स्वरूपातील फाईल तुम्ही खालील देण्यात आलेला रखान्यामध्ये पाहू शकता.

अर्ज नमुना क्र. 01येथे क्लिक करा
अर्ज नमुना क्र. 02येथे क्लिक करा
नवीन शासन निर्णय येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment