NREGA: गावातच मिळेल शासनाकडून हाताला काम ! नोंदणी केलात का ? रोजगार हमी योजना

NREGA : राज्यशासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच काम उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. ‘रोजगार हमी योजना मनासारखं काम व कामाप्रमाणे दाम’ असं सुद्धा या योजनेला म्हटलं जात. सदर योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्वच जिल्ह्यातील गावांमध्ये दरवर्षी रोजगार हमी योजना राबविण्यात येते. यामध्ये गावातील विविध कामांचा आढावा घेऊन नागरिक कामगारांना काम वाटून दिली जातात. परंतु ही काम खरीप हंगामानंतर तसेच रब्बी पीक असल्यास तो हंगाम पूर्ण झाल्यानंतर येन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात.

रोजगार हमी योजना

रोहयो म्हणजेच रोजगार हमी योजनेअंतर्गत नागरिकांना काम मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते. रोजगार नसलेल्यांसाठी किमान ठराविक दिवस रोजगाराची हमी देणारी शासनाची रोजगार हमी योजना खूपच महत्त्वकांक्षी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांपैकी प्रभावीपणे चालणारी ही एक योजना असून या योजनेसाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना वर्षातील काही ठराविक दिवस रोजगारसाठी काम दिली जातात.

रोजगार नोंदणी केलेल्या कामगारांकडून काम करून घेतल्यानंतर त्याबद्दलचा मोबदला म्हणून शासनाकडून ग्रामपंचायतमार्फत कामाच्या बदल्यात रोख रक्कम किंवा अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो. मनरेगा अंतर्गत गावातील रोजगार कामगारांसाठी विविध काम उपलब्ध करून दिली जातात. ज्या कामांचा आढावा तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता.

कोणकोणती कामे दिली जातात?

  • ग्रामीण कनेक्टिव्हिटी
  • जलसंधारण
  • पूरनियंत्रण आणि संरक्षण बांध
  • दुरुस्ती सीपेज टाक्या, लहान बंधारे
  • वनीकरण, उत्खनन, नवीन तलाव
  • जमीन सपाटीकरण
  • वृक्षारोपण

रोजगार हमी योजना स्वरूप

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र (मनरेगा) अंतर्गत केंद्रशासन प्रति कुटुंब 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देतो व प्रति कुटुंब 100 दिवसाच्या मजुरीसाठी निधी पुरवली जाते असा या योजनेचा मुख्य स्वरूप आहे.

या महिन्यापासून रोहयो कामांना वेग

राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात विशेषता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या कामाला वेग येतो. ज्यामध्ये तलाव, बोडी निर्मिती, विविध रस्त्यांची रखडलेली काम, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे निर्मिती इत्यादींचा समावेश असतो. मार्च महिन्यापासून उन्हाळ्यापर्यंत मनरेगाची काम मोठ्या प्रमाणावर केली जातात.

तुम्हीसुद्धा खेड्यापाड्यातील नागरिक किंवा कामगार असाल व तुमच्या हाताला सध्यास्थितीत काम नसेल, तर यासाठी तुमच्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर ग्रामपंचायतकडून कामाची उपलब्धता झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहिती तुम्हाला दिली जाईल.

👇👇👇👇👇👇👇👇

या समाजातील कामगारांना विना गॅरंटी कर्ज देणारी योजना

Leave a Comment