Silk Subsidy : रेशीम शेतीसाठी मिळणार 3 लाख 24 हजार रु. अर्ज प्रक्रिया, अनुदान, पात्रता कागदपत्रं संपूर्ण माहिती पहा

Silk Subsidy : शेतकऱ्यांना शेतात विविध लागवडीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिलं जातं. सदर लेखाच्या माध्यमातून आपण आज रेशीम शेती अनुदान योजनेबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याला तुती लागवड अनुदान योजना या नावान सुद्धा संबोधल जात. रेशीम उद्योग विकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येते.

रेशीम शेती अनुदान योजना 2023

नुकताच रेशीम शेती अनुदानासंदर्भातील शासन निर्णय (GR) 06 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला असून याअंतर्गत रेशीम शेती अनुदान योजना आता पंचायत समिती त्याचप्रमाणे कृषी विभागाच्यावतीने सुद्धा राबविली जाणार आहे. रेशीम शेतीला तुती लागवड या नावानसुद्धा ओळखल जाते. शेतकऱ्यांना अद्याप सदर योजनेची पूर्ण शहानिशा नसल्याकारणाने याचा लाभ मिळत नाही.

रेशीम शेती अनुदानासाठी अर्ज कुठे करावा ? अर्जाची प्रक्रिया काय असेल ? तुती लागवड करण्यासाठी अनुदान किती ? कोणती आवश्यक कागदपत्र लागतील ? यासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्हाला जर रेशीम शेतीसाठी 3 लाख 24 हजारांचा अनुदान मिळवायचा असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

संपूर्ण राज्यभरात योजनेची सुरुवात

सुरुवातीला संपूर्ण राज्यभरात रेशीम/तुती लागवड प्रकल्प सुरू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये रेशीम लागवडीचा प्रयोग करण्यात आला. शासनाकडून जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची लागवड केली.

📣 विश्वकर्मा योजना : या कारागिरांना विना गॅरंटी कर्ज मिळणार; पहा संपूर्ण माहिती

रेशीम शेती लागवडीचा शेतकऱ्यांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता, लागवडीची जिल्हानिहाय कक्षामर्यादा रुंदावण्यात आली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रेशीम लागवड करण्यात येईल. यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येईल. यासंदर्भातील नुकताच शासन निर्णय (GR) सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

रेशीम लागवड अनुदान किती ?

रेशीम शेती लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 1 एकर तुती लागवडीसाठी 2.24 लाख रु. एवढा अनुदान तीन टप्प्यांमध्ये देण्यात येईल; म्हणजेच शेतकऱ्यांना अनुदानाचा वाटप 3 वर्षात विभागून दिल जाईल. 1000 चौरस फूट बांधकामासाठी 99 हजार रुपये म्हणजेच 3.23 लाख एवढी रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाईल.

रेशीम लागवड अनुदानासाठी आवश्यक कागदपत्र

  • जमिनीचा 7/12 व 8अ उतारा
  • राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक झेरॉक्स
  • अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
  • मनरेगा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत
  • ओळखपत्र म्हणून मतदानकार्ड किंवा आधारकार्ड

नवीन शासन निर्णय (GR) व अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रेशीम लागवड अनुदानाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा


🔴 महत्वाची माहिती : अर्ज प्रक्रिया व इतर महत्त्वाची आवश्यक माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी अर्जदारांनी कृपया खालील देण्यात आलेला नवीनत्तंम शासन निर्णय नक्की वाचावा.

Leave a Comment