पोस्टाची नवीन योजना ! आता फक्त 399 रुपयात मिळवा 10 लाखाचा विमा, कुटुंबाच्या संरक्षणासाठी या योजनेत नक्की सहभाग घ्या

Post Office Insurance Scheme : सध्याच्या धावत्या युगात कोणत्यावेळी काय होईल सांगता येणार नाही, त्यासाठी आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रत्येकानी भविष्याचा विचार करून आपला जीवन विमा नक्की काढून घ्यावा. हीच संकल्पना लक्षात घेऊन इंडिया पोस्ट बँकेमार्फत नवीन विमा पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिस 399 विमा योजना

पोस्ट ऑफिस विभागामार्फत व टाटा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने पोस्ट ऑफिस 399 विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या विमा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 399 रुपयांमध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट विभागाकडून दिला जाणार आहे. ही विमा पॉलिसी 18 वर्षाच्या पुढील व्यक्तींना काढता येईल आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत याची मर्यादा असेल.

या योजनेतून नागरिकांना फक्त 299 किंवा 399 रुपयात एका वर्षासाठी 10 लाख रुपयापर्यंतचा विमा मिळू शकतो. सदर विमा योजनेत विमाधारकांचा अपघाती मृत्यू, अपंगत्व किंवा कायमचा आंशिक अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयापर्यंतच संरक्षण दिलं जातं. याशिवाय योजनेच्या माध्यमातून अपघातानंतर तातडीने रुग्णालयात दाखल झाल्यास 60,000 रुपयापर्यंतचा खर्च आणि रुग्णालयात दाखल न होता घरीच उपचार केल्यास 30,000 रुपयापर्यंतचा खर्चसुध्दा दिला जातो.

इतर खर्च आणि पॉलिसीमधील फरक

वरील नमूद खर्चाव्यतिरिक्त रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवस सतत प्रतिदिन 1,000 रु. मिळतात. कुटुंबाला या प्रसंगादरम्यान वाहतुकीसाठी 25000 रुपयांपर्यंतचा खर्चसुध्दा सदर योजनेच्या माध्यमातून दिला जातो. कोणत्याही कारणास्तव पॉलिसीधारक व्यक्तींचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी 5000 रु. व मृतव्यक्तींच्या पश्चात त्यांच्या किमान 2 मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात येते.

📣 फक्त 436 रुपयात मिळवा दोन लाख रुपयाचा विमा; केंद्र सरकारची भन्नाट विमा पॉलिसी

इंडिया पोस्राटाकडून राबविण्यात येणाऱ्या सदर योजनेत विविध प्रकारच्या 2 योजना विशेषता राबविण्यात येतात. या दोन्ही योजनांचा विचार केला, तर यामध्ये साधारणता साम्य आहे; परंतु थोडा मूलभूत फरकसुद्धा आहे. 399 च्या विमा योजनेत विमाधारकांच्या अपघाती मृत्यूनंतर मुलांना शिक्षणासाठी 1 लाख रुपयापर्यंत मदत दिली जाते, त्याचबरोबर अपघातानंतर दवाखान्यात येण्याजाण्यासाठी म्हणजेच प्रवासासाठी कुटुंबीयांना 10 दिवसापर्यंत प्रतिदिवस 1,000 रु. मिळतात व 25,000 रु. वाहतूक खर्च, अंत्यसंस्कारासाठी 5000 इत्यादी; परंतु 299 च्या योजनेत शिक्षण खर्च, प्रतिदिन 1000, वाहतूक खर्च 25 हजार व अंत्यसंस्कारासाठी खर्च इत्यादी लागू नसेल.

Post Office 399 Insurance in Marathi

  • अपघाती मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकांच्या कुटुंबांना 10 लाख रु. आर्थिक मदत.
  • पॉलिसीधारक व्यक्तीला कायमचे अपंगत्व आल्यास 10 लाख रु. मिळणार.
  • दवाखान्याचा जवळपास 60,000 रु. खर्च भेटणार
  • मुलाच्या व मुलीच्या शिक्षणासाठी 1 लाखापर्यंत शैक्षणिक मदत भेटणार (जास्तीत जास्त दोन मुलांना फायदा)
  • दवाखान्यात ऍडमिट झाल्यास प्रतिदिवस 1,000 याप्रमाणे दहा दिवसापर्यंत 10,000 रुपये मिळणार.
  • OPD साठी 30,000 रु. भेटणार.
  • अपघातात पॅरॅलिसिस झाल्यास 10 लाख रुपये भेटणार.
  • कुटुंबातील व्यक्तीला दवाखाना प्रवासासाठी 25 हजार रुपये प्रवासी खर्च मिळणार.
  • ही पॉलिसी एकदम चांगली व विश्वासू असल्यामुळे लाभ लाभार्थ्यांना त्वरित दिला जातो. कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा किंवा अडचण या पॉलिसीअंतर्गत येत नाही.

पोस्ट पॉलिसी 399 पात्रता

  • पॉलिसीधारक किंवा पॉलिसी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती भारतीय असावा.
  • पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित व्यक्तीचा बचत खाता असावा.
  • पॉलिसीधारक व्यक्तींच वय 18 ते 65 या दरम्यान असावं.
  • या योजनेचा कालावधी 10 वर्षाचा असेल, याची पॉलिसीधारकांनी दक्षता घ्यावी.
  • सदर योजनेसाठी पॉलिसीधारकांना प्रति वर्ष 399 रु. इतकी रक्कम भरावी लागेल.

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 online form

पोस्ट ऑफिस विमा योजना 399 साठी कोणत्याही प्रकारची ऑनलाइन प्रक्रिया इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे ज्या अर्जदारांना या योजनेचा किंवा या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी जवळील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत संपर्क साधावा. त्याठिकाणी सर्व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाईल व पॉलिसीधारकांचा 399 प्लॅन चालू करण्यात येईल.

Leave a Comment