Pmkisan : केवायसी करा नाहीतर मिळणार नाही पीएम किसान निधाचा हफ्ता

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रु याप्रमाणे मदत केली जाते. ही मदत वर्षातून 3 वेळेस म्हणजेच दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता आधार सलग्न बँक खात्यावरती वितरित केला जातो.

PM किसान Ekyc अनिवार्य

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्याचा शासनाचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी हा होय. पीएम किसान योजना सुरू झाल्यानंतर पुढील काही महिन्यात यामधील त्रुटी कमी करण्यात आल्या, ज्यामध्ये बोगस लाभार्थ्यांना वगळण्यासाठी केवायसी प्रक्रिया, आधारमध्ये दुरुस्ती, बँक खात्याला आधार क्रमांक लिंक इत्यादी नवीन बदल संबंधित विभागाकडून करण्यात आले. यामधील महत्त्वाचा बदल म्हणजे ई-केवायसी.

अद्याप बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्यामुळे, त्यांना हप्ता मिळण्यास विलंब होत आहे किंवा परिणामी शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही. त्यामुळे संबंधित विभागाकडून उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याची माहिती दिली जात आहे. केवायसी करण्यासाठी शासनाकडून आता 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे केवायसी सोबतच लाभार्थ्यांना आधारकार्ड सुद्धा लिंक करावे लागेल.

ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे, त्यामुळे या तारखेच्या आत केवायसी करणे गरजेचे आहे; नाहीतर सदर योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार नाही. शेतकरी बांधवांसाठी ही खूपच चांगल्या प्रकारची आर्थिक मदत असून, यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ होतो. त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी जेणेकरून या योजनेपासून वंचित राहता येणार नाही. ही माहिती शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहचवा.

अधिक माहिती

तुमच्या घरात 60 वर्षापेक्षा जास्त वयाची एखादी व्यक्ती किंवा जेष्ठ नागरिक असतील, तर आता शासनाकडून त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना माध्यमातून 3,000 रुपये सरसकट त्यांच्या बँक खात्यावरती दिले जाणार आहेत. यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील आजी, आजोबा किंवा इतर जेष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून सदर योजनेचा लाभ मिळू शकतात.

तुमची KYC झाली का ? तपासण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment