PM Kisan : निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम किसान 17वा हफ्ता या दिवशी जमा होणार

PM Kisan योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात. संबंधित योजनेचा सतरावा हप्ता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मे महिन्यात शेवटच्या तारखेला किंवा पुढील महिन्यात दिला जाणार असून हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी असलेली तांत्रिक अडचण पूर्ण करावी लागेल, यासंदर्भातील थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

PM Kisan 17th Installment

हवामानातील बदलामुळे मागील यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. निसर्गाच्या या बदलामुळे हातात तोंडाशी आलेला घास गेला. मी सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी जोरात सुरू असतात, त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊन धडकली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान किसान सन्मान योजना 17वा हफ्ता जमा होणार आहे. प्रत्येक 4 महिन्याला शेतकऱ्याना 2000 दिले जातात.

या योजनेचा सोळावा हप्ता चालू वर्षातील फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत यवतमाळ-नागपूर या ठिकाणच्या कार्यक्रमातून हस्तांतरित करण्यात आला होता. 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 21000 कोटी रुपये सदर योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले होते. गेल्या 5 वर्षात 15 हप्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात 2.8 लाख कोटी रु. जमा करण्यात आले आहेत.

अर्ज कसा करावा ?

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, त्यांना खालीलप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करून या योजनेचा लाभ मिळवता येईल. त्यासाठी खालीलप्रमाणे अर्ज करावा.

  • सर्वप्रथम शासनाकडून देण्यात आलेल्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर “किसान कॉर्नर” या पर्यायावर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडावा लागेल.
  • रजिस्ट्रेशन करताना तुमचं राज्य, जिल्हा, तालुका व गाव इत्यादी माहिती निवडावी.
  • माहिती निवडल्यानंतर अर्जामध्ये संबंधित शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्याची निवड करावी.
  • त्यानंतर Get OTP या पर्यायावर क्लिक करावे.
  • मोबाईल क्रमांकावर आलेली ओटीपी नोंदवून पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
  • आधार प्रमाणीकरण करून शेतीसंदर्भातील संपूर्ण माहिती भरावी, त्यानंतर save या बटनावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

📢 माहिती कामाची : ग्राम पंचायत अपंग योजना

हफ्ता हवा असेल, ही 4 कामं झटपट करा

1. तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असल्याची खात्री संबंधित बँकेत जाऊन करा.

2. तुमचे बँक खाते NPCI सोबत सलग्न असल्याची खात्री ऑनलाईन पद्धतीने तपासून पहा.

3. तुमची केवायसी पूर्ण असल्याची खात्री करा, अन्यथा हप्ता मिळणार नाही.

4. भू-सत्यापन, तुमच्या शेतीविषयक आवश्यक कागदपत्र संबंधित कार्यालयाकडून सत्यापन केल्याची स्थिती तपासा.

👇👇👇👇👇👇👇👇

PM Kisan नवीन नोंदणी व अर्जाची तपासणी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment