PM किसान आजपासून संपणार ई-केवायसी डेडलाइन : PM Kisan eKyc Last Date Maharashtra

PM Kisan : पीएम किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी वार्षिक 6,000 रुपये इतका अनुदान स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येतं. राज्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे; मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे आणखी सुध्दा बहुतांश शेतकरी लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.

ई-केवायसीसाठी शेवटची तारीख

उर्वरित शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी विहीत मुदतीत म्हणजे 6-10 सप्टेंबर 2023 पूर्ण करायची आहे, नाही केल्यास सदर लाभार्थ्याचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे, बँक खात्याशी आधार संलग्न करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत. कृषी विभागाकडून वारंवार सूचना देऊनसुद्धा लाभार्थी शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे प्रतिसाद न देता वरील बाबी अपूर्ण ठेवल्या आहेत.

9-10 सप्टेंबरपासून कोणत्याही क्षणी पीएम किसान योजनेची ई-केवायसी व इतर अटी पूर्ण करणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, त्यानंतर लाभ दिला जाणार नाही; सोबतच अशा शेतकऱ्यांची नाव योजनेतून कायमस्वरूपी काढण्यात येतील, अशी माहिती एका पत्रकाद्वारे तालुका कृषी विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना कळविण्यात आलेली आहे.

लाभासाठी त्वरित eKyc करून घ्या

पीएम किसान योजनेच्या अटीची पूर्तता करण्यासाठी कृषी विभागाने मागील काही दिवसापासून सतत 4 महिने मोहीम राबवली होती. ज्यामध्ये वंचित शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ घेऊन त्यांच्या हप्त्याची रक्कम पूर्ववत सुरू व्हावी, यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या होत्या; तरीसुद्धा काही शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता 9-10 सप्टेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच नाव योजनेतून वगळण्यात येईल, अशा शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्यावी; अन्यथा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा कायमस्वरूपी लाभ बंद करण्यात येईल. ई-केवायसी कशाप्रकारे करावी? त्यासाठी तुम्ही खाली लिंकवर क्लिक करून अधिकची माहिती मिळवू शकता.

PM किसान ई-केवायसी कशी पूर्ण करावी ? येथे क्लिक करून अधिक माहिती पहा !

Leave a Comment