PM Kisan Payment : 8 करोड शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पीएम मोदींकडून खात्यात 2000 रुपये जमा

PM Kisan Payment : पीएम किसान योजनेच्या 15व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पंधरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत भाऊबीज या सणानिमित्त पाठविण्यात आलेला आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती जसं हप्ता आला असेल, तर स्थिती (Status) कशी तपासावी? लाभार्थी यादीत नाव कसं पाहावं? इत्यादी माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

पीएम किसान 15वा हफ्ता आला !

झारखंड राज्यातील खुंटी याठिकाणी एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत देशातील 8 करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधराव्या हप्ताची रक्कम पाठविण्यात आली आहे. पंधराव्या हप्त्यासाठी शासनाला जवळपास 18,000 करोड रुपये ट्रान्सफर करावे लागले आहेत. मोदीजींच्या हस्ते हप्ता ट्रान्सफर करण्यात आल्यानंतर, संबंधित शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती हप्ता पाठवल्याबाबतचा SMS सुध्दा पाठविण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जातात. ज्यामध्ये दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे 3 हप्त्यात एकूण 6,000 हजार रुपये रक्कम दिले जाते. 14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेला होता. गोरगरीब शेतकऱ्यांची दिवाळी नक्कीच खास ठरली आहे; कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पाठविण्यात आल्यानंतर लगेच पुढील काही दिवसात पीएम किसान योजनेचा 15वा हप्तासुद्धा पाठवण्यात आलेला आहे.

हप्ता आला किंवा नाही तपासा

  • तुम्हाला पंधरावा हप्ता मिळालेला आहे किंवा नाही, याची स्थिती तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता. यासाठी येथे क्लिक करा
  • वेबसाईट उघडल्यानंतर Know Your Status या पर्यायावर क्लिक करा.

  • Know Your Status या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, त्याठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका, कॅपचा टाका आणि Get Data या पर्यायावर क्लिक करा.

  • जर तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक माहिती नसेल, तर अशा परिस्थितीत Know Your Registration no. या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपीच्या आधारे तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक मिळवा.
  • रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाल्यानंतर परत वरील ठिकाणी रजिस्ट्रेशन क्रमांक व कॅपचा टाकून Get Data या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे तुमच्या अर्जाची स्थिती दाखवली जाईल, ज्यामध्ये एकूण हफ्ते, बँक नाव इत्यादी मूलभूत माहिती असेल.

👇👇👇👇👇👇👇👇

पीएम किसान लाभार्थी यादी याठिकाणी क्लिक करून पहा !

Leave a Comment