NREGA : शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटीचा आराखडा तयार; विहीर, शेततळे, वृक्ष लागवड, फळबाग या विविध योजनांचा लाभ मिळणार

NREGA : यंदाच राज्यातील दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता शासनाकडून विविध प्रकारची निर्णय घेण्यात येत आहेत. ज्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना विविध सुविधा, शेतकऱ्यांसाठी सुविधा, विद्यार्थ्यांसाठी सुविधा इत्यादींचा समावेश आहे. राज्य शासनाकडून नुकताच राज्यातील 40 तालुके आणि उर्वरित 178 तालुक्यामधील जवळपास 1,000 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

शेततळे, विहीर, फळ, वृक्ष लागवड इत्यादींचा समावेश

या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा 10 हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या नवीन आराखड्यात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी 10 लाख विहिरी, 7 लाख शेततळे आणि 10 लाख हेक्टरवर फळबाग, बांधावर वृक्ष लागवड, रेशीम उद्योग, बांबू लागवड इत्यादी विविध बाबींचा समावेश असणार आहे.

शासनाकडून आखण्यात आलेला 10 हजार कोटींचा आराखडा शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायक ठरणार असून याची अंमलबजावणी संबंधित विभागाकडून लवकरच सुरू करण्यात येईल. शासनाच्या या नवीन आराखड्यामुळे किंवा तरतुदीमुळे दुष्काळग्रस्त भागातील सर्व गरजू व प्रयत्नशील नागरिकांना मनरेगाचा लाभ मिळण्यास मदत होईल.

आराखड्यात नवीन काय ?

  • नवीन आराखड्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे, त्या खालीलप्रमाणे.
  • दुष्काळग्रस्त भागातील स्मार्टफोन नसलेल्या भूमिहीन कुटुंबांना रोजगारातून भत्ता मिळेल, असे नियोजन केले जाणार आहे.
  • अँड्रॉइड मोबाइल असलेल्या भूधारकांना रोजगार दिला जाणार आहे.
  • गॅस सिलेंडर भरू न शकणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील रोजगारांना रोजगार दिला जाईल.

आराखड्याचा मुख्य उद्देश

हा आराखडा दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेला असून संबंधित आराखड्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल; परिणामी दुष्काळग्रस्त भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन शेतीला चालना मिळेल.

👇👇👇👇👇👇👇👇

नवीन नमो शेततळे योजना सुरु; 7300 शेततळ्यांची निर्मिती होणार GR पहा

Leave a Comment