शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा अभियानांतर्गत धान्य कोटी अनुदान योजना शासनाकडून सुरू, या ठिकाणी करा अर्ज

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाकडून वेळोवेळी नवनवीन योजना सुरू करण्यात येतात. या योजना सुरू करण्यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतातील किंवा इतर कामकाज करत असताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासोबतच त्यांना आर्थिक अनुदान उपलब्ध व्हावा हा होय. असेच एक योजना अन्नसुरक्षा विभागाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजे धान्य कोटी अनुदान योजना होय. यासंदर्भातील थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूयात.

धान्य कोटी अनुदान योजना

शेतकऱ्यांना काही वेळा शेतातील पिकवलेलं धान्य साठवणूक करताना नाकी नऊ येऊन जातं, यामागील मुख्य कारण म्हणजे पाऊस, वारा व इतर अडचणी. हीच बाब लक्षात घेता शासनाकडून शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात पिकवलेलं सोयाबीन किंवा इतर धान्य साठवण्यासाठी सरकारी अनुदान देण्यात येत आहे. याचा वापर करून शेतकरी सुमारे 500 किलो कडधान्य किंवा इतर धान्य साठवू शकतील.

आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल नेमकी ही योजना काय आहे किंवा कोणती आहे ? तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य) आणि पोषण त्रणधान्य विकास योजना 2023-24 अंतर्गत घरगुती साठवणुकीची कोटी घटक पाच क्विंटल प्रति शेतकरी धान्य कोटी योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. संबंधित पात्र लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे. असे आवाहन नांदेड जिल्हा कृषी संचालक भाऊसाहेब बराटे यांनी केले आहे.

अनुदानास पात्र कोण ?

सदर योजनेचा लाभ अनुसूचित जाती, आदिवासी, महिला शेतकरी, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व इतर पात्र शेतकऱ्यांना देण्यात येईल. 5 क्विंटल साठवण क्षमता असलेल्या कोटीसाठी लागू असलेला अनुदान दर खर्चाच्या 50% किंवा रु. 2,000 यापैकी जे कमी असेल, ते पात्र शेतकऱ्यांना देण्यात येईल. याव्यतिरिक्त एक लाखाहून अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल.

या घटकाची खरेदी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यानंतर शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी समवेत अक्षांश व रेखांशासह फोटो घेतल्यानंतर तपासणी करून लाभार्थ्यांना डीबीटी पद्धतीने त्यांच्या बँक खात्यावरती धान्य कोटी अनुदान विहित मुदतीत वितरित करण्यात येईल. धान्य कोटी अनुदान लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे.

धान्य कोटी अनुदान योजना अर्ज कुठे करावा?

धान्य कोटी अनुदान अर्ज करण्यासाठी किंवा संबंधित योजनेची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नजीकच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे किंवा तालुका कृषी सहाय्यक कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना संबंधित योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात येईल व शेतकरी पात्र असल्यास विहित नमुन्यातील अर्ज सुद्धा देण्यात येईल.

Leave a Comment