New Bank Rules : 1 ऑक्टोबर पासून बँकेच्या नियमात होणार मोठे बदल ! कामाची माहिती नक्की वाचा

New Bank Rules : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जनधन योजना सुरू करण्यात आल्यानंतर राज्यातील बहुतांशी नागरिकांनी आपलं बचत खातं बँकेमध्ये मोफत काढून घेतलं.

बँकेची नवीन नियमावली

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून बँक खात्यासंदर्भात व त्याच्याशी निगडित नवनवीन विविध नियम काढण्यात येतात, अशी नवनवीन नियमावली जनसामान्य नागरिकांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा पुढे चालून याचा त्रास होऊ शकतो. आता येत्या 1 ऑक्टोबरपासून बँकेच्या नियमात काही बदल करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण सदर लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

ज्या व्यक्तीकडे बँक खात असेल, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांमार्फत शेअर मार्केट केलं जातं ज्याला आपण ट्रेडिंगसुद्धा म्हणतो. जर तुम्ही सुद्धा ट्रेडिंग करत असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची असणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सर्व ट्रेडिंग खाताधारकांना नॉमिनेशन म्हणजेच वारसदार जोडण आवश्यक आहे. नॉमिनेशनची प्रक्रिया संपूर्णता: अनिवार्य करण्यात आलेली असून ट्रेडिंगधारकांना नॉमिनी जोडणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे. जर तुम्हीसुद्धा ट्रेडिंग करत असाल, तर 30 सप्टेंबर 2023 पूर्वीच तुमच्या संबंधित ट्रेडर खात्याला नॉमिनी जोडून घ्या.

2000 च्या नोटा रद्द ?

भारतीय रिझर्व बँकेकडून काही दिवसांपूर्वी 2000 च्या नोटा संदर्भात एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली होती. ज्यामध्ये ज्या व्यक्तीकडे 2000 च्या नोटा असतील, त्यांना या व्यतिरिक्त बँकेत जाऊन इतर चलन म्हणजेच 100, 200 च्या नोटा बदलून घ्यावयाच्या होत्या. कारण 30 सप्टेंबर 2023 नंतर 2000 च्या नोटा चलनात राहणार नाहीत. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप 2000 च्या नोटा बँकेत जाऊन बदलून घेतलेल्या नसतील, त्यांनी त्वरित एक ऑक्टोबरपूर्वी बँकेत जाऊन चलन बदलून घ्यावे.

📨 हे पण वाचा : बँकेला वारस प्रमाणपत्र का द्यावं लागत ? थोडक्यात पण कामाची माहिती नक्की वाचा !

बचत खात्यासाठी महत्त्वपूर्ण नियम

लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जनधन योजना सुरू झाल्यापासून देशातील सर्वच नागरिकांकडे बचत खात उपलब्ध झाला आहे. तुमच्याकडे जर एखादा बचत खाता असेल, तर रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून या संदर्भात महत्त्वपूर्ण नियम सुरू करण्यात आलेला आहे. तो नियम म्हणजे आता तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे; आधार लिंक नसल्यास संबंधित खातेधारकांचा अकाउंट काही काळासाठी फ्रिज म्हणजेच बंद करण्यात येईल.

🏦 हे पण वाचा : येस बँकेकडून 50,000 रुपयापर्यंत तात्काळ कर्ज मिळवा, मोबाईलवर अर्ज करता येणार

वरील सर्व नियम 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व जनसामान्य नागरिकांसाठी लागू असतील, त्यामुळे तुमच्याकडे बचत खात असेल, तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल किंवा तुमच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा असतील, तर नवीन नियमावली वाचून त्वरित या संदर्भात प्रक्रिया करा, जेणेकरून आपल्याला भविष्यकाळात. या नियमावलीला दुर्लक्ष केल्यानंतर अडचण निर्माण होणार नाही.

Leave a Comment